Anjali Aade
Anjali Aade esakal
नाशिक

Industrial Safety Day : ‘शून्य अपघात’ हेच ध्येय!

सतीश निकुंभ

Industrial Safety Day : राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दिवस दर वर्षी ४ मार्चला साजरा केला जातो. सुरक्षा उपायांवर प्रकाश टाकणे आणि लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कामाच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी त्यांचे अनुसरण करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. औद्योगिक उत्पादने सुरू असताना एकही अपघात होणार नाहीत, याची काळजी त्या प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कामगार, व्यवस्थापनाने ‘शून्य अपघात’ हेच ध्येय ठेवले पाहिजे.- अंजली आडे, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग, नाशिक

(nashik Industrial Safety Day Zero accident is goal marathi news)

दे शभरात दर वर्षी ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत कारखान्यात सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी कल्याणाची संस्कृती वाढविण्यासाठी सुरक्षाविषयक विविध कार्यक्रम घेतले जातात. सुरक्षेबाबत जनजागृतीत केली जाते.

संभाव्य धोके काय उद्‍भवू शकतात आणि त्याबाबत त्याक्षणी काय काळजी घ्यावी, याबाबतही या सप्ताहात माहिती दिली जाते. नॅशनल सेफ्टी कौन्सिलची ४ मार्च १९६६ ला स्थापना झाली. आरोग्य व सुरक्षिततेबाबत जनजागृती करून समाजाचा विकास घडवून आणणे, असा हेतू या कौन्सिलच्या स्थापनेमागे आहे.

नॅशनल सेफ्टी कौन्सिल ही संस्था रस्ता सुरक्षा, मानवी आरोग्य सुरक्षा आणि पर्यावरणीय सुरक्षा याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्य करते. समाजात सुरक्षिततेबाबतची जनजागृती व्हावी म्हणून ४ मार्च १९७२ ला सर्वप्रथम राष्ट्रीय सुरक्षितता दिवस उत्स्फूर्तपणे सर्वत्र साजरा करण्यात आला. तेव्हापासून ४ ते १० मार्च या कालावधीत सुरक्षा सप्ताह दर वर्षी साजरा करण्यात येतो. (latest marathi news)

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची थीम दर वर्षी बदलते आणि ते कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करते. दर वर्षी, राष्ट्रीय सुरक्षा परिषद राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि सप्ताहासाठी एक थीम निवडते. या वेळी ‘ईएसजी उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा’ ही थीम आहे.

‘शून्य अपघात’ हे ध्येय ठेवून कारखाने अधिनियम १९४८ व महाराष्ट्र कारखाने नियम १९६३ च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून कारखान्यातील कामगारांची सुरक्षितता, आरोग्य व कल्याण सुनिश्चित करणे, हे या विभागाचे प्रमुख काम आहे. व्यावसायिक सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. कारण ती कामगारांना होणाऱ्या हानीपासून संरक्षण करते, उत्पादकता वाढवते, आरोग्यसेवा खर्च कमी करते आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवते.

हे फायदे मिळविण्यासाठी कारखाना भोगवटादारणे सुरक्षा उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कामगार, कर्मचारीवर्ग व जनसामान्य यांच्यात सुरक्षाविषयी जनजागृती केल्यास सुरक्षा संस्कृती जोपासली जाऊन आपला देश एक सुरक्षित राष्ट्र म्हणून गणला जाईल. माझी सुरक्षा ही सर्वप्रथम माझी जबाबदारी आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे.

कारखानदारांसाठी मार्गदर्शक सूचना

- सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करणे.

- ज्वालाग्रही रसायनाचा वापर / हाताळणी/ साठवणूक केली जाते, तेथे प्रज्वलन स्रोत वगळण्यासाठी उपाययोजना करणे.

- यंत्रांच्या धोकादायक भागांना सुरक्षा जाळी बसविणे.

- सेफ ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन करणे.

- योग्य सुरक्षा साधनांचा योग्य प्रकारे वापर व त्याची नियमित निगा ठेवावी.

- ज्वालाग्रही रसायनाच्या जवळ अग्निशमन उपकरणे सुसज्ज ठेवणे.

- कारखान्यासाठी आपत्कालीन आराखडा, आपत्कालीन परिस्थिती ओढवलयास

तपशीलवार आपत्ती नियंत्रण उपाययोजना तयार करणे.

- कारखान्याचा आपत्कालीन आराखड्याचा आढावा घेण्याकरिता आणि मानक कार्यप्रणालीचे

मूल्यमापन करण्याकरिता नियमित मॉकड्रिल घेणे.

- अभिक्रिया नियंत्रणासाठी यंत्रणा व तिची वेळोवेळी तपासणी

- तापमान दाब नियंत्रण साधने बसवावीत. इमर्जन्सी किटची व्यवस्था असावी.

- कामाची जागा स्वच्छ असावी, प्रथमोपचार सुविधा सदैव अद्ययावत ठेवाव्यात.

- व्यवसायजन्य आजारांसंबंधी प्रमाणित शल्यचिकित्सकचा सल्ला घ्यावा.

- घातक पदार्थ हाताळण्याची आणि कारखान्यात अशा हाताळणीचे पर्यवेक्षण करण्यासाठी

- कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी विहित पद्धतीने सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी

पात्रता आणि अनुभव असलेल्या सक्षम व्यक्तींची नियुक्ती करणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT