ITI esakal
नाशिक

ITI Admission : आयटीआय अर्जासाठी आजपर्यंत मुदतवाढ!

Nashik News : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी बुधवार (ता. ३)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा,

सिन्नर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी बुधवार (ता. ३)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतर आयटीआयच्या विविध ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आयटीआयचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदत दिलेली होती. (ITI application deadline extended till today)

अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज निश्चित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही कार्यवाही केली जाणार आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या गुणवत्तायादीबाबत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार आहे. (latest marathi news)

तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जातील निवडक माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास तो करता येणार आहे. त्यानंतर मात्र अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येईल.

अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत विद्यार्थ्यांना सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT