Traffic Route Change esakal
नाशिक

Nashik Traffic Route Change: पंचवटीत जगन्नाथ रथ यात्रा मिरवणूक उद्या! शहरातील वाहतूक मार्गात बदल; पर्यायी मार्गांचा करावा वापर

Nashik News : ही यात्रा मिरवणूक पंचवटी, भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून निघणार असल्याने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic Route Change : रविवारी (ता. ७) श्री जगन्नाथ रथ यात्रा मिरवणूक निघणार आहे. ही यात्रा मिरवणूक पंचवटी, भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून निघणार असल्याने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (Nashik Jagannath Rath Yatra procession in Panchavati)

श्री जगन्नाथ रथ यात्रा मिरवणुकीला रविवारी (ता.७) सकाळी १० वाजता पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिर येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर रथयात्रा जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पुल, दहिपुल, धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सीता गुंफा, श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, ढिकलेनगर, नाग चौक, काट्या मारुती चौक आणि पंचमुखी हनुमान मंदिर येथे दुपारी तीन वाजता मिरवणूक संपेल. या मिरवणूकीमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्शवभूमीवर वाहतूक शाखेतर्फे पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. (latest marathi news)

प्रवेश बंद मार्ग

- सितागुंफाकडे येणारी वाहतूक

- मालेगाव स्टॅण्ड,

रोकडोबा तालीम

- काळाराम मंदिराकडे येणारी वाहतूक (मालवीय चौक)

- गणेशवाडी कॉर्नर

- संतोष टी कॉर्नर,

- काट्या मारुती पोलीस चौकी

- नेहरु चौक, दहिपूल, धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा

पर्यायी मार्ग

- गणेशवाडी मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती - संतोष टी पॉईंट - द्वारका-शालिमार मार्गे जातील

- दिंडोरी नाका ते होळकर पुलाकडे जाणारी वाहने मखमलाबाद नाका, रामवाडी पुल मार्गे जातील

- संतोष टी पॉर्ईटकडून दिंडोरी नाक्याकडे जाणरी वाहने एकेरी मार्गाने जातील.

- बुधा हलवाई- बादशाही कॉर्नर मार्गे जातील

- सांगली बँक सिग्नल - नेहरु गार्डन - नेपाळी कॉर्नर - शालिमार मार्गे जातील

- रामवाडी पुलावरून अशोकस्ंतंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल, शालिमार - गंगापूर रोड, सीबीएस मार्गेजातील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT