Police esakal
नाशिक

Nashik Fraud Crime News: कटारिया, पारख यांच्या बंगल्यावर छापा! उपनगर पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यात घरझडती

Crime News : पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime News : नाशिकरोड परिसरातील ‘डेस्टिनेशन वन’ या प्रकल्पातील गुंतवणूकीत फसवणूक केल्याप्रकरणी एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या गंगापूर रोड परिसरातील बंगल्यावर उपनगर पोलिसांनी छापा टाकला असून रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरू होती. त्याचप्रमाणे, सतिश पारख यांच्याही घरावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यासंदर्भात पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Nashik Kataria Parakh bungalow raided upanagar police action)

संशयित नरेश जगुमल कारडा, मनोहर जगुमल कारडा, अशोक मोतीलाल कटारीया, सतीश धोंडुलाल पारख, अनुप सुभाषचंद्र कटारीया यासह संचालकांविरोधात उपनगर पोलिसात एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्याच्या तपासाकामी ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांना उपनगर पोलिसांनी नोटीस बजावून बोलाविले होते. वारंवार संपर्क साधून त्यांना चौकशीसाठी बोलाविल्यानंतरही ते पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहिलेले नाहीत.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशान्वये उपनगर पोलिसांनी गंगापूर रोड परिसरातील सुयोजित गार्डन येथे असलेल्या अशोक कटारिया यांच्या ‘अंशुमान’ या बंगल्यावर शनिवारी (ता. २०) छापा टाकला. यावेळी बंगल्यामध्ये कटारिया कुटूंबियांपैकी कोणीही उपस्थित नसल्याचे समजते. पोलिसांनी यावेळी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेतला असता, त्यांच्या हाती काही कागदपत्रे सापडल्याचे समजते.  (latest marathi news)

याप्रमाणे, सतिश पारख यांच्या गंगापूर रोड परिसरातील बंगल्यावरही पोलिसांनी छापा टाकून घरझडती घेतली. यातही पोलिसांच्या हाती गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याचे दावा पोलिसांनी केला आहे. मनोज लेखराम हरियानी यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी त्यांची 99 लाखांची फसवणूक केलेली आहे.

"अशोक कटारिया, सतिश पारख यांच्या गंगापूर रोड परिसरातील घरी ‘सर्चिंग’ करण्यात आली. यात गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत."

- मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT