Nashik Lemon Rate Hike  esakal
नाशिक

Nashik Lemon Rate Hike : उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाचा वाढला तोरा ! एका लिंबासाठी 10 ते 15 रुपये मोजण्याची वेळ

Lemon Rate Hike : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने फळांच्या रसाबरोबर लिंबूपाणी, लिंबू सरबतांची मागणी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lemon Rate Hike : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढल्याने फळांच्या रसाबरोबर लिंबूपाणी, लिंबू सरबतांची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात लिंबांचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लिंबू १५० ते १७५ रुपये किलोच्या दराने विकले जात आहेत. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहेत. (Nashik lemon price increase due to summer in district marathi news)

त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचा तोरा वाढत आहे. आता एप्रिल सुरू असून लिंबाचा दर मे संपेपर्यंत तरी हेच चित्र राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे लिंबू खरेदी करताना एक किंवा दोन लिंबू घेऊनच ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे. लिंबाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची मागणी वर्षभर असते. उन्हाळ्यात ही मागणी अधिक वाढते.

या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत जवळपास घरोघरी बनते. परिणामी पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी दुप्पट असते. यंदाही अशीच स्थिती आहे. मार्चपासून लिंबाचे दर सातत्याने वाढत होते. मार्चमध्ये शेकड्यामागे १२५ ते १५० रुपयांदरम्यान लिंबू विकले जात होते. त्यापूर्वीचा दर १०० रुपयेही होता. पण, उन्हाळा सुरू होताच आवक कमी झाली आणि दरवाढ सुरू झाली आहे. (latest marathi news)

दुष्काळी परिस्थितीचा फटका

भाजीपाला बाजारपेठेत लिंबाच्या आकारानुसार त्याचा दर ठरतो. एकदम लहान आकाराचे लिंबू असल्यास दहा रुपयांना एक, तर वीस रुपयांना तीन अशा दराने किरकोळ बाजारात विक्री सुरू आहे. उन्हाळा संपेपर्यंत तरी लिंबांचे दर असेच चढे राहतील, अशी शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लिंबू उत्पादक देश आहे.

यंदा बदलते हवामान आणि दुष्काळी परिस्थितीचा फटका लिंबाच्या पिकाला बसला आहे. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी लिंबाच्या बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारातील मागणीनुसार पुरेसा पुरवठा न झाल्याने लिंबाच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

''दरवर्षी उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. हिवाळ्यात दर कमी असतात, तेव्हा नाशिक तसेच आजूबाजूच्या परिसरातून स्थानिक लिंबू बाजारात येतो. उन्हाळ्यात बाहेरून येणारा माल जरा महाग असतो. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा सामना करावा लागतो.''- भरत रणगीर, भाजीविक्रेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain : मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान; नांदेड, लातूर जिल्ह्यांत कहर; सात जिल्ह्यांतील १३० मंडलांना दणका

ED Notice : ‘ED’चे मोठे पाऊल!, इंटरपोलकडून पहिल्यांदाच पर्पल नोटीस जारी

Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

SCROLL FOR NEXT