nashik zp esakal
नाशिक

Nashik News : काम वाटपापूर्वी नोटीस बोर्डावर कामांची यादी प्रसिद्ध करावी; मजूर फेडरेशनची जि. प. प्रशासनाकडे मागणी

Nashik : जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागांकडून कामांचे वाटप करण्यात येते. मात्र, दालनात बैठक घेऊन या कामांचे वाटप होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या तिन्ही बांधकाम विभागांकडून कामांचे वाटप करण्यात येते. मात्र, दालनात बैठक घेऊन या कामांचे वाटप होते. यात अनेक मजूर, ठेकेदार यांच्यावर अन्याय होतो. त्यासाठी काम वाटप समितीच्या बैठकीची पूर्वसूचना व काम वाटप समितीच्या बैठकीत वाटप करण्यात येणाऱ्या कामांची यादी ही आठ दिवस आधी नोटीस बोर्डावर लावण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मजूर संघाचे संचालक अमोल थोरे यांनी केली आहे. ( List of work should be published on notice board before allotment of work labour demand )

याबाबत संचालक थोरे यांच्या नेतृत्वाखाली मजूर संस्था प्रतिनिधी, ठेकेदार संघटना प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १६) काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने काम वाटपातील तक्रारी मांडत निवेदन सादर केले. ५ जुलै २०२४ ला काम वाटप समितीच्या बैठकीबाबत पत्र दिले होते. परंतु, त्या संदर्भात आजतागायत प्रशासन स्तरावरून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तसेच कोणत्या विभागात काम वाटप समितीच्या बैठकीची माहिती नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली नाही. त्यानंतर वेळोवेळी सर्व विभागांत विचारणा करूनही काम वाटप समितीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काम वाटपात मागील तारीख टाकून पुन्हा एकदा काम वाटप बैठकीची गोपनीय बैठक घेण्याचे काम चालू आहे, असे समजले. (latest marathi news)

त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारच्या काम वाटप समितीची बॅक डेटेड बैठक घेण्यात येऊ नये, आमच्या मजूर संस्थांवर अन्याय करू नये, कोणतीही काम वाटप समितीची बैठक पूर्वसूचना न देता व काम वाटप समितीच्या बैठकीत कामे वाटप होणारी यादी नोटीस बोर्डावर न लावता केल्यास सर्व मजूर संस्थांचे सभासद, ठेकेदार जिल्हा परिषदेसमोर उपोषण करतील.

तरी, काम वाटप समितीच्या बैठकीची पूर्वसूचना व काम वाटप समितीच्या बैठकीत वाटप करण्यात येणाऱ्या कामांची यादी आठ दिवस आधी नोटीस बोर्डावर लावण्यात यावी. त्यानंतरच काम वाटप समितीची बैठक घेतली जावी. मजूर सभासद, मजूर सह. संस्थांना होणाऱ्या काम वाटप समितीच्या बैठकीतून न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT