Shantigiri Maharaj esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची एक खिडकी योजना! पहिल्याच दिवशी शांतिगीरी महाराजांना प्रचारासाठी हव्या 5 गाड्या

Political News : निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी आचारसंहिता कक्षाकडे परवानगीचे अर्ज सादर करण्यास सुरवात झाल्याचे दिसून येते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवार प्रशासनाकडून विविध परवानग्या घेण्यासाठी अर्ज दाखल करीत आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024) जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु केलेल्या एक खिडकी योजनेच्या पहिल्याच दिवशी शांतिगीरी महाराजांनी प्रचारासाठी पाच गाड्यांची परवानगी मागितली आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 Commission One Window Scheme marathi news)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच प्रशासनाकडून वेगवेगळ्या गोष्टींवर निर्बंध येतात. राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फलक, कोनशिला, भिंतीचित्र बंदिस्त करुन प्रचारावर लक्ष ठेवले जाते. उमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या गाड्यांची प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांच्या नाष्टा, जेवणावर होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवावी लागणार आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी आचारसंहिता कक्षाकडे परवानगीचे अर्ज सादर करण्यास सुरवात झाल्याचे दिसून येते. शांतिगीरी महाराज यांनी पाच गाड्यांची परवानगीसाठी अर्ज केला आहे. लोकांच्या भेटीगाठी या गाड्यांचा वापर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, गाठीभेटी हा प्रचाराचाच एक भाग असल्याने त्यांना आयोगाने तयार केलेल्या विशिष्ट नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.

उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर या अर्जांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचे गृहित धरुन एक खिडकी योजनेत दोन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला लागणाऱ्या पहिल्याच इमारतीमध्ये हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

दिंडोरीत कक्ष

अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी दिंडोरी विधानसभेचा मीडिया कक्ष व तक्रार निवारण कक्ष तहसील कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. सोनाली चौरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. येथून दिंडोरी व पेठ तालुक्यातील मतदारांचे प्रश्‍न, तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.  (latest marathi news)

इंधन पुरवठादार करणार जनजागृती

भारत निवडणूक आयोग आणि पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे शिक्षण आणि लोकशाही प्रक्रियेस बळकटी देण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुसार आदर्श आचारसंहिता कालावधीत इंधन पुरवठादार त्यांच्या वेबसाईटवर मतदारांसाठी प्रबोधनपर संदेश प्रदर्शित करणार आहेत.

या संदेशाद्वारे मतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळणार आहे. देशभरात तेल कंपन्या मतदार शिक्षणाचे पोस्टर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जच्या स्वरूपात त्यांच्या कार्यालयात तसेच प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणार आहेत. निवडणूक आयोगाने नुकताच इंडियन बॅंक असोसिएशन आणि पोस्ट विभाग यांच्याशी सामंजस्य करार केला असून आता बॅंका आणि पोस्ट विभाग निवडणूक आयोगास मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सहाय्य करीत आहेत. त्यात आता पेट्रोलियम कंपन्यांनीही सहभाग नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

Chandoli Koyna Tiger Territory : चांदोली, कोयना जंगलात वाघांनी हद्दी केल्या फिक्स, तीन वाघांमध्ये कोणाची दादागिरी

Latest Marathi news Live Update : "भारतातील मुस्लिम पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत"- एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल

Crime News : थरार केरळमधील शोधमोहिमेचा! बोईसरच्या चिमुकल्याला पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून नाही, तर पित्याच्या विळख्यातून सोडवले

Republic Day Weekend 2026: प्रजासत्ताक दिनी मुलांसोबत आउटिंगचा प्लॅन? पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

SCROLL FOR NEXT