CRPF EVM Security esakal
नाशिक

Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

Lok Sabha Election 2024 : इव्हिएम मशिन हे अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊसमध्ये नियाजित स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्यासाठी सीआरपीएफचा कडेकोड बंदोबस्त तैनात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Election Duty : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर इव्हिएम मशिन हे अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊसमध्ये नियाजित स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या असून, त्यासाठी सीआरपीएफचा कडेकोड बंदोबस्त तैनात आहे. तर, या वेअरहाऊस सभोवती शहर पोलिसांच्या पथकाकडून दरतासाला फुट पेट्रोलिंग सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा आढावा पोलीस आयुक्तांकडून घेतला जात आहे. (Nashik lok sabha Election 2024 Police Duty marathi news)

अंबड एमआयडीसीतील वेअर हाउस परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ‘इव्हीएम’ ठेवलेल्या ठिकाणी आतमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) दोन सशस्त्र तुकड्या, तर वेअर हाउसच्या बाहेरील जागेत राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन सशस्त्र तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

तर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, याठिकाणी शहर पोलिसांचे पथक वेअर हाऊस बाहेरील बंदोबस्त सांभाळत आहे. या वेअर हाऊसच्या बाहेरून फुट पेट्रोलिंग शहर पोलिसांच्या पथकाकडून केली जात आहे.

त्याचा आढावा नियंत्रण कक्षाकडून दर तासाला घेतला जात आहे. या पथकाच्या दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त तैनात केला आहे. वेअर हाऊसच्या बाहेर असलेल्या चौकांमध्येही पोलिसांनी चौक्या सुरू केल्या असून, कारवाईने नजर ठेवली जात आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. (latest marathi news)

नियंत्रण कक्ष कार्यान्वित

याच ठिकाणी पोलिसांचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून, पोलिस निरीक्षकांसह तीन अंमलदार नियुक्त केलेले आहेत. यासह ओळखपत्राशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यास मनाई आहे. वेअर हाउसच्या सीसीटीव्ही कक्षातही पोलिस नेमले आहेत. याठिकाणी एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक व २० अंमलदारांची तुकडी तैनात आहे.

वेअर हाउस परिसरात विनाकारण कोणीही टेहाळणी करणार नाही. कोणीही फिरणार नाही, यासंदर्भात काटेकोरपणे दक्षता बंदोबस्तावरील पोलिसांकडून घेतली जात असून, तसे आढळून त्यावर कठोर कारवाईचेही निर्देश अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT