Nashik Lok Sabha Election  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : निकालाच्या उत्कंठेने नियोजनाची आखणी; उत्तर महाराष्ट्रातील जागांकडे लक्ष

Lok Sabha Election : महिनाभरापासून जिकडे-तिकडे फक्त निवडणुकीचीच चर्चा असून, कोणता उमेदवार जिंकेल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची गणिते मांडली जात आहेत.

मोठाभाऊ पगार : सकाळ वृत्तसेवा

देवळा : मंगळवारी (ता. ४) विवाहतिथी वा इतर शुभकार्य नसले, तरी इतर अनेक नियोजित कार्यक्रमांना फाटा देत बहुतांश मंडळी दूरचित्रवाणी संचासमोर बसून वा मोबाईलला चिकटून लोकसभेचे निकाल पाहणे पसंत करणार आहेत. कारण याच दिवशी लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आहे. आणि या वेळी सर्वांनाच काय निकाल बाहेर पडतात, कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार, याची कमालीची उत्सुकता असेल. (Nashik Lok Sabha Election)

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून जिकडे-तिकडे फक्त निवडणुकीचीच चर्चा असून, कोणता उमेदवार जिंकेल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याची गणिते मांडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने सर्वत्र निकालाचीच चर्चा असेल.

पहिल्या फेरीपासून दूरचित्रवाणी संचावरच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवत कोणता उमेदवार, तसेच कोणता पक्ष किती पुढे- किती मागे, कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, पंतप्रधानपद कोणाकडे जाणार, तसेच आपल्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील, राज्यातील जागांबाबत सर्वांनाच उत्सुकता असेल. याशिवाय, राज्यातील व देशातील उल्लेखनीय लढतींचा निकाल जाणून घेणे यावरही नागरिकांचा भर असणार आहे.

कोण निवडून येणार, हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच किती मताधिक्यांनी निवडून आला, तसेच कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती मते मिळाली, यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असल्याने ही आकडेवारी पाहण्यासाठी मंडळी सावध असेल. यामुळे बरीच मंडळी इतर कामांना सुटी टाकण्याच्या नियोजनात आहेत. (latest marathi news)

तर काही जण त्या दिवशी असलेल्या कार्यक्रमांना थातुरमातुर हजेरी लावून वा बाय-बाय करून निवडणुकीचे अपडेट घेणे पसंत करतील. काही जण आतापासून या कार्यक्रमांना जाण्याची जबाबदारी महिला वर्गावर टाकून नामानिराळे झाले आहेत; तर काही चक्क रजा टाकून निवडणूक निकालाचा आनंद घेणार आहेत. ज्यांनी या निकालावर पैजा लावल्या आहेत, ते तर सकाळपासून निकालाकडे डोळे लावून बसणार आहेत.

या निवडणूक निकालाला आता पाचच दिवस शिल्लक राहिले असल्याने मतदारांसह नागरिकांचा उत्साह वाढू लागला आहे. निकाल कोठे पाहायचा, याचे नियोजन ठरू लागले आहे. कारण, हे निकाल पाहत असताना उपस्थित प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेषण करीत असतो. बऱ्याच हॉटेलमालकांनी मोठ्या स्क्रीन लावून निकाल पाहण्याची सोय करायला सुरवात केली आहे.

सहा मतदारसंघांबाबत उत्कंठा

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव व रावेर या सहाही मतदारसंघांत कोण निवडून येईल, याबाबत मोठी उत्कंठा लागून आहे. मतदानाची अधिकची टक्केवारी कुणाला तारणार आणि कुणाला हरविणार, याबाबतचे अंदाज आणि महाराष्ट्रातील जागा कुणाला किती, याकडे प्राधान्याने पाहिले जाणार आहे. कारण, यावरून आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

Pune Water Cuts: धरणे शंभर टक्के भरली, तरीही पाणी कपात का? मनसेची आयुक्तांकडे कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

Pune Municipal Transfers: पुणे महापालिकेत ४०७ कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या; समुपदेशन फेरी टाळल्याने प्रशासनात खळबळ

कुलगाममध्येही 'पहलगाम पॅटर्न'? धर्म विचारून मजुरांची हत्या? तपास सुरू

Revenue Camp: थेऊर समाधान शिबिरात ग्रामीण भागात महसूल दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांची पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधीची घोषणा

SCROLL FOR NEXT