accident  esakal
नाशिक

Nashik News : मालेगाव- नामपूर रस्ता बनला अपघाताचा केंद्र; दर 2-4 दिवसांनी अपघात

Nashik : शहराला लागून असलेल्या चारही बाजूचे रस्ते प्रशस्त झाले आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने दळणवळण सोयीचे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराला लागून असलेल्या चारही बाजूचे रस्ते प्रशस्त झाले आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याने दळणवळण सोयीचे झाले आहे. मालेगाव- नामपूर रस्ता रुंदीकरणानंतर प्रशस्त झाला असून वर्दळ वाढली आहे. त्याचबरोबर या रस्त्यावर सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहे. मालेगाव ते वडनेर पर्यंतचा रस्ता अपघाताचा केंद्र बिंदू ठरु पाहत आहे. मालेगाव- नामपूर रस्तावरील कॅम्प भागातील दुध डेअरीपासून ते अजंगपर्यंत रस्त्यात केवळ दोन ठिकाणी गतिरोधक आहेत. (Malegaon Nampur road became center of accident )

रुंदीकरणानंतर रस्ता गुळगुळीत झाला आहे. दुचाकी व चारचाकी चालक आपली वेगाने वाहने हाकतात. दर दोन-चार दिवसांनी अपघात होत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यातच दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

वाहतूक नियमांचा विसर

मालेगाव- नामपूर रस्त्यावर चार ठिकाणी पेट्रोलपंप आहेत. रस्त्यावरून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जाणारी वाहने ही रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहने न पाहता आणि वळण्यासाठी इंडिकेटर देत नसल्याने वाहनांचे अपघात होवू लागले आहे. रस्त्यावरून वळण घ्यायचे राहिल्यास येथे हात देण्याची प्रथा रुढ आहे. यामुळे देखील अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील पेट्रोलपंप तसेच मोक्याच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.

मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

मालेगाव-अजंग रस्त्यावर मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट आहे. दुचाकीचालक साधारणत: शर्टच्या खिशात मोबाईल ठेवून वाहने चालवितात. चोरटे दुचाकीवर पाठीमागून येत दुचाकीस्वाराच्या खिशातून मोबाईल काढून पोबारा करतात. या गोंधळात अनेक दुचाकींचे अपघात होवू लागले आहेत. चोरट्यांचा तपास लागत नसल्याने बहुतेक जण तर चोरीच्या तक्रारही देत नाहीत. भोसले पेट्रोलपंप ते अजंग भवानी टेकडी दरम्यानच्या रस्त्यावर सायंकाळी सात ते अकरा या वेळेत मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट दिसून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT