The situation of Bhojapur Dam today evening esakal
नाशिक

Nashik Monsoon Rain Update : भोजापुर धरणात 2 दिवसांत पस्तीस टक्के पाणीसाठा जमा

Nashik News : पश्चिम पट्ट्यातील सर्वच लहान-मोठे बंधारे भरल्यामुळे बुधवारपासून भोजापुर धरणात नद्यांद्वारे पाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत भोजापुर धरण 35 टक्के इतके भरले.

सकाळ वृत्तसेवा

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दोन ते तीन दिवस चांगल्या प्रकारे वरूण राजाने कृपा केल्यामुळे पश्चिम पट्ट्यातील सर्वच लहान-मोठे बंधारे भरल्यामुळे बुधवारपासून भोजापुर धरणात नद्यांद्वारे पाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत भोजापुर धरण 35 टक्के इतके भरले. (Monsoon Rain Update Thirty five percent water storage in Bhojapur Dam)

शुक्रवारी पावसाने थोड्या फार प्रमाणात उघडपी घेतल्यामुळे नदीला येणाऱ्या पाण्यात थोडी घट झाल्यामुळे पाण्याचा वेग थोडासा मंदावला आहे. मात्र दोन ते तीन दिवसांमध्ये पाण्याचा पुरवठा माळुंगी नदी द्वारे सुरू राहिल्यास भोजापुर धरण निश्चितपणेओव्हरफ्लो होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.

भोजापूर धरणाची एकूण क्षमता 361 दशलक्ष घनफूट (एम. सेफ्टी) इतकी असून साधारणत: आज मितिला भोजापुर पस्तीस टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे, असेच म्हणावे लागेल. सध्याच्या स्थितीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला जरी असला तरी भोजपूर धरण भरल्यानंतर पाटाद्वारे जे पाणी सोडले जाते, ते नदी नाल्यांना चांगल्या प्रकारे वाहिल्यानंतर भोजापुर धरणावर अवलंबून असलेल्या गावांना आणि शेतकऱ्यांना या पाण्याचा निश्चितपणे फायदा होईल. (latest marathi news)

मात्र आता शेतकऱ्यांचे लक्ष फक्त भोजापुर धरण कधी भरेल याकडे लागले असून या भागातील अनेक शेतकरी भोजापुर धरणावरती पाणीसाठा किती आला आहे, हे बघण्यासाठी गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT