Due to the continuous rains that have started in Igatpuri taluka and Ghatmatha area, water is stagnating in the fields. esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरीत 24 तासांत 100 मिमिपेक्षा जास्त पाऊस! धुक्यामुळे वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्ग मंदावला

Nashik News : तालुक्याच्या पश्चिम घाट पट्टयासह कसारा घाट परिसरात सलग तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गेल्या २४ तासांत १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्राची चेरापुंजी तसेच पावसाचे माहेरघर असणाऱ्या तालुक्याच्या पश्चिम घाट पट्टयासह कसारा घाट परिसरात सलग तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून गेल्या २४ तासांत १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. (More than 100 mm of rain in 24 hours in Igatpuri)

तालुक्याच्या विविध भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान असून पावसाबरोबर दाट प्रमाणात धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्गसुद्धा मंगळवारी (ता.२) मंदावल्याचे चित्र होते. तालुक्याच्या विविध भागात शेतीला तलवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच संततधार पावसामुळे दोन्ही शहराच्या विविध भागांत पाणी तुंबले असून सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे.

दरम्यान मुसळधार पावसाची धार तुटत नसल्यामुळे धरणांच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. या दमदार पावसामुळे तालुक्यातील भाम, भावली, दारणा नद्यांसह छोटे-मोठे ओहोळ व तलाव ओसंडून वाहत आहेत. तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक वाढ झाल्याची नोंद झाली आहे.

जिकडे तिकडे पाणीच पाणी

तालुक्यातील अति पावसाच्या भागात पावसाने पुन्हा मुसंडी मारली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरी सदो, नांदगाव सदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, कारावाडी, अवळखेड, काराचीवाडी, वाकी, भरवज, निरपण, काळुस्ते, चिंचलेखैरे तसेच पूर्व भागातील गोंदे. (latest marathi news)

पाडळी देशमुख, अस्वली मुकणे, जानोरी, मुंढेगाव, नांदगाव, वाडीवऱ्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकूर, शेणीत माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी व आदी भागांत व पूर्व भागातील मानवेढे, काळूस्ते, वैतारणा पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेतांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. पावसामुळे भात लागवडीला वेग येणार आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात

२४ तासात झालेला पाऊस

धरण क्षेत्र : आजचा पाऊस : एकूण पाऊस (मिमि)

दारणा : ४५ : २०७

मुकणे : ३२ : १८९

वाकी : ७२ : ३२५

भाम : ७६ : २७१

भावली : १०० : ४९९

वालदेवी : ३७ : १३३

गंगापूर : ३० : २०३

कश्यपी : ५५ : १७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT