Nashik Municipal Corporation sakal
नाशिक

नाशिक महानगरपालिका निवडणूक | ‘बालेकिल्ल्याला छेदण्याचे आव्हान’

मुस्लिम मतदान ठरणार निर्णायक, मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला संधी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : हिंदू-मुस्लिम मिश्रित मतदारांचा समावेश असलेला हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. संघ विचारांना मानणारा भाग असला, तरी काँग्रेसचा उमेदवार या भागातून सातत्याने निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला छेद देण्याचे आवाहन भाजपसमोर असेल. एक, दोनदा भाजप व शिवसेनेला मतदारांनी साथ दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विचार करता शिवसेनेला निवडून येण्याची संधी आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यास मध्य विधानसभा मतदारसंघात प्रवेश करण्याचा ‘श्रीगणेशा’ होईल.

काँग्रेसच्या तिकिटावर शाहू खैरे अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. श्री. खैरे यांच्यामुळे काँग्रेसचा गड येथे शाबूत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गडाला भाजपकडून भगदाड पाडण्याचे प्रयत्न होणार, हे नक्की. मात्र, त्यात किती यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपला येथे यश मिळाल्यास मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली, असे मानता येईल. त्यामुळे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी हा प्रभाग महत्त्वाचा आहे.

प्रभागातील हद्दींचा विचार करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या घटकांसाठी हा प्रभाग नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच पॅनल तयार करावे लागेल. स्वतंत्र पॅनल तयार झाल्यास मतविभाजन अटळ ठरेल. पॅनलमध्ये उमेदवारांचा समावेश करताना सर्वसमावेशक नेतृत्वाचा शोध सध्या सुरू आहे. काझी गढीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्याने अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे विकासकामांसंदर्भात नवीन मुद्दा आता हाती घ्यावा लागणार आहे. रामसेतू पूल, गोदावरी नदीपात्रात सुरू असलेली स्थापत्यविषयक कामे, गावठाणातील कामांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, गरुडरथाला निर्माण होणारा अडथळा आदी मुद्दे यंदाच्या निवडणुकीत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

प्रभागाची व्याप्ती : गोरेराम लेन, सराफ बाजार, बडी दर्गा, कुभांरवाडा, काझी गढी, पठाणपुरा.

  • उत्तर : दत्तमंदिर, यशवंतराव महाराज समाधी पटांगण, बालाजी कोठ, रोकडोबा तालीम, मोदकेश्वर मंदिर, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत.

  • पूर्व : टाळकुटे पुलापासून अमरधाम रोडने काझी गढी, कुभांरवाडा, फकिराबाग झोपडपट्टी, शिवाजी चौकातील साई टी स्टॉलपर्यंत.

  • दक्षिण : शिवाजी चौकातील साई टी स्टॉलपासून आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने उत्तरेकडील पठाणपुरा परिसर. दक्षिणमुखी मारुती मंदिर, दंडे हनुमान चौकापर्यंत. पिंजारघाट रोडने अब्दुल हमीद चौक (दूध बाजार) इक्बाल हॉटेलपर्यंत.

  • पश्चिम : हॉटेल इक्बालपासून उत्तर दिशेने दामोदर थिएटरपर्यंत. सरस्वती लेन, जी. एन. आडगावकर ज्वेलर्सपर्यंत. भिकुसा लेन, जी. के. ब्रदर्स बुक डेपो, मेन रोडवरील वसंत आणि कंपनी दुकानापर्यंत. मेन रोडने उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन रविवार कारंजावरील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत. पुढे अहिल्यादेवी होळकर पुलापर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT