Nashik Municipal Corporation Election Scheduled Castes and Scheduled Tribe Voter
Nashik Municipal Corporation Election Scheduled Castes and Scheduled Tribe Voter sakal
नाशिक

नाशिक निवडणूक | सगळ्यांचंच भवितव्य आंबेडकरी मतदारांवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिखरेवाडी-मोटवाणी भागातील सर्वाधिक विकासकामे धरलेल्या भाजप प्रभावाच्या मतदारसंघाला यंदा नाशिक रोड भागातील सर्वांत मोठ्या कॅनॉल रोड झोपडपट्टीसह भीमनगरचा भाग जोडला गेल्याने नवा प्रभाग २६ पूर्णपणे संमिश्र रचनेचा बनला आहे. नव्या प्रभागात ३२ हजार मतदारांपैकी दहा हजार ५९८ मतदार अनुसूचित जाती-जमातीचे असून, रिपब्लिकन व आंबेडकरी चळवळीतील एकतृतीयांश मतदारांचा कौल विजयाच्या दावेदारीत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच भाजप आणि रिपाइंबहुल मतदारांच्या सत्तासंघर्षात शिवसेनेसह काँग्रेस आघाडीच्या दावेदारीला महत्त्व आले आहे.

जुन्या दसक आणि शिखरेवाडी अशा दोन प्रभागांचा जोडून हा नवा प्रभाग बनला आहे. दोन्ही जुन्या प्रभागांत भाजपचा प्रभाव राहिला आहे. शिखरेवाडी विकसित आणि उपेक्षित झोपडपट्टी भागातील मतदार, असा नव्या रचनेत प्रभाग २६ भिन्न स्वरूपाचा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम अशी दोन टोके एकत्र बांधली जावीत, अशी या प्रभागाची रचना आहे. एका बाजूला भाजपचा बालेकिल्ला असलेला शिखरेवाडी भागातील विकसित भाग, तर दुसरीकडे उपनगर ते पंचकपर्यंत विस्तारलेली नाशिक रोडची सर्वांत मोठी झोपडपट्टी, असे विसंगत भाग एकत्र आले आहेत. साधारण ३२ हजार मतदारांपैकी ११ हजारांहून अधिक मतदार मागासवर्गीय असल्याने रिपब्लिकन व आंबेडकरी मतदारांचा कौल तितकाच महत्त्वाचा आहे. साहजिकच या भाजप आणि रिपाइंच्या सत्तामारीत क्रमांक दोनवर झेप घेतलेल्या शिवसेना आणि काही भागात काँग्रेस आघाडीच्या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

महिला सोडत खूप महत्त्वाची

प्रभागातील इच्छुकांवर नजर टाकली, तर नव्या दमाच्या तरुण आणि रस्त्यावर मदतीसाठी धावून जाण्याची धमक असलेल्या कार्यकर्त्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे काम करायची इच्छाशक्ती असेल, अशांनी येथे नशीब आजमावे इतकी येथे चुरस दिसणार आहे. मात्र यात महिला आरक्षण पडले, तर नव्या दमाच्या अनेक तरुण युवा कार्यकर्त्यांचे पत्ते कापले जाऊन त्यांचे राजकीय भवितव्य आणखी पाच वर्षे दूर जाणार आहे. त्यामुळे अनेकांचा राजकीय उदय महिला आरक्षणावर ठरणार आहे. नाशिक रोड भागातील सर्वांत मोठी झोपडपट्टी, कामगार कष्टकऱ्यांची वसाहत, उच्चभ्रू व्यवसायिकांच्या बहुमजली इमारती, सर्वांत मोठे क्रीडागंण, सर्वाधिक जागरूक मतदारांसह इतरही अनेक वैशिष्ट्यांनी हा प्रभाग महत्त्वाचा आहे.

प्रभागाची व्याप्ती : साने गुरुजीनगर, शिखरेवाडी ग्राउंड, भीमनगर, नेहरूनगर वसाहत, इंदिरा गांधी स्लम, आम्रपाली, आशर सोसायटी, करन्सी नोटप्रेस, विद्युत भवन.

  • उत्तर : इच्छामणी कॅनल जंक्शनपासून कॅनल रोडने जेल रोड, इंगळेनगर चौफुलीपर्यंत

  • पूर्व : जेल रोड, इंगळेनगर चौफुलीपासून जेल रोडने दक्षिणेकडे येऊन बिटको चौकापर्यंत

  • दक्षिण : बिटको चौकापासून नाशिक-पुणे महामार्गाने उत्तरेकडे एमआयडीसी ऑफिस रोडवरील विजय मोटार ड्रायव्हिंग स्कूलपर्यंत. पुढे उत्तरेकडे जाऊन शिखरेवाडी ग्राउंडपर्यंत. दक्षिणेकडील रस्त्याने पुढे दक्षिणेकडे नाशिक-पुणे महामार्गापर्यंत पुढे नाशिक-पुणे महामार्गाने इच्छामणी कॅनल चौकापर्यंत

हे आहेत इच्छुक

संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, अंबादास पगारे, कैलास मुदलियार, रोहन देशपांडे, संग्राम फडके, प्रमोद साखरे, शशिकांत उन्हवणे, मंगेश मोरे, संजय भालेराव, अनिल बहोत, विकास पगारे, अरुणा आहेर, आकील काद्री, आश्‍विन पवार, उमेश चव्हाण, किरण पगारे, मंगला आडके, क्रांता वराडे, गायत्री गाडेकर, ज्योती चव्हाणके, डॉ. मयूरी पाटील- मोगल, तुषार दोंदे, दीपाली वाघ, नरेंद्र साळी, नितीन चंद्रमोरे, प्रशांत गागुंर्डे, रितेश केदारे, विद्या बर्वे, श्रीकांत मगर, संजय पगारे, सुप्रिया कदम, सुरेश घुगे, हर्षदा बर्वे, प्रतिभा पगारे, अरुणा आहेर, डॉ. सुनील हिरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT