elections elections
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीवर 'ओमिक्रॉन'चे सावट

विक्रांत मते


नाशिक :
पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची (Nashik Municipal Corporation Elections) प्रशासकीय व राजकीय तयारी सुरू असताना कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. तब्बल सातपट गतीने वाढणाऱ्या या विषाणूचे एक हजार रुग्ण आढळले तरी सर्वच व्यवहार ठप्प होणार आहे. त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे. ओमिक्रॉनच्या बचावासाठी निवडणुकादेखील लांबणीवर पडणार असून, त्यासंदर्भात आढावा घेण्याची तयारी महापालिका पातळीवर सुरू झाली आहे.

महापालिकेच्या निवडणुका पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे. कुठलाही अडथळा न आल्यास फेब्रुवारी महिन्यात निवडणुका अपेक्षित आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या सूचनेनुसार लोकसंख्येनुसार १३३ प्रभागांचा कच्चा प्रारूप आराखडा तयार केला असून, राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. पंधरा दिवसात आराखड्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर चतुःसीमा निश्‍चिती होईल. चतुःसीमा निश्‍चितीनंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर प्रभागरचनेचा अंतिम आराखडा जाहीर होईल. ही नियमित प्रक्रिया झाली तरच निवडणुका वेळेत होतील. त्यापूर्वी नगरसेवकांची संख्या वाढविण्यात आल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. इतर मागासवर्गीय आरक्षणासंदर्भातदेखील न्यायालयात दावा सुरू आहे. न्यायालयाने दखल घेतल्यास निवडणुका लांबण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या संकटाने निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिंता वाढली

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर औरंगाबाद, नवी मुंबई व कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अशाच पद्धतीने लांबणीवर टाकण्यात आल्या. आता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत असताना ओमिक्रॉनचे नवे संकट उभे राहिल्याने त्या अनुषंगाने निवडणुका पुढे ढकलले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सातपटीने ओमिक्रॉन वाढत असल्याने राज्यात कमी रुग्णसंख्या असली तरी सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT