Nashik NMC News esakal
नाशिक

Nashik NMC News : अस्वच्छता करणाऱ्या 980 नागरिकांवर कारवाई

Nashik News : महापालिका घनकचरा विभागाकडून वर्षभरात अस्वच्छता करणाऱ्या ९८० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३० लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका घनकचरा विभागाकडून वर्षभरात अस्वच्छता करणाऱ्या ९८० नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३० लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा विभागाकडून प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कचऱ्याचे विलगीकरण न करणे त्याचप्रमाणे सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी आहे.

प्लॅस्टिक वापर व अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या २७८ नागरिकांकडून १४ लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नदी व नाल्यांमध्ये कचरा टाकल्याने ३९ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे ४८ जणांवर तीन लाख २९ हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर अस्वच्छता केल्याने १८५ नागरिकांकडून १ लाख १८ हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला. पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यावर अस्वच्छता झाल्याने तीन नागरिकांकडून सहा हजार रुपये दंड वसूल झाला.

मोकळ्या भूखंडावर बांधकाम कचरा टाकल्या प्रकरणी ११६ जणांवर २ लाख १६ हजार चारशे रुपयांची कारवाई करण्यात आली. कचरा जाळल्याने एक लाख ९५ हजार रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मलबा टाकल्याने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. (latest marathi news)

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने ५४ जणांकडून ५४ हजार ७५० रुपये वसूल करण्यात आले आहे. उघड्यावर लघुशंका केलेल्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चार हजार आठशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. आठ नागरिकांनी जैविक कचरा उघड्यावर टाकल्याने त्यांना १ लाख ३५ हजार रुपये दंड करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केलेल्या नऊ व्यक्तींना दहा हजार पाचशे रुपये, तर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या दोन जणांना सहा हजार रुपये दंड तर वर्षभरात १७० नागरिकांनी ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण न केल्याने त्यांच्याकडून एक लाख ७६ हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

SCROLL FOR NEXT