Bus Fire Accident News  esakal
नाशिक

Nashik Accident : नाशिकमध्ये बसला भीषण आग; 8 ते 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ एका खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर खासगी बसने पेट घेतला असून त्यामध्ये ८ ते १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३२ ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि जवान दाखल झाले असून तोपर्यंत प्रवाशी मृत्यूमुखी पडले होते. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.

(Nashik Bus Accident Fire Latest Updates)

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. घटना झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यानंतर जखमींंना बाहेर काढण्यात आले असून जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींचा उपचार शासनातर्फे केला जाणार असल्याची माहिती दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT