MNS President Raj Thackeray along with his family bowed down at Adimaya's feet... esakal
नाशिक

Nashik Navratri 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयासमवेत आदिमायेच्या चरणी नतमस्तक

Latest Navratri 2024 News : सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून भाविक भक्तांच्या गर्दीन अवघा सप्तशृंगी गड आदिशक्तीच्या भक्तीत एकरुप झाला आहे.

दिगंबर पाटोळे

वणी : आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर सुरु असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस रात्री ८ वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयासमवेत आदिमायेच्या चरणी नतमस्तक होत लीन झाले. (MNS President Raj Thackeray darshan at saptashrungi)

सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून भाविक भक्तांच्या गर्दीन अवघा सप्तशृंगी गड आदिशक्तीच्या भक्तीत एकरुप झाला आहे. आदिमायेच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच राजकिय, सामाजिक क्षेत्र पदाधिकारीही हजेरी लावत आहेत.

आज रात्री मनसेे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह सप्तशृंगी गडावर येत आदिमायेची मनोभावे पुजा करीत नतमस्तक झाले. यावेळी ट्रस्टच्यावतीने विश्वस्त तथा तहसिलदार रोहिदास वारुळे, अॅड ललीत निकम, मन्यज्योत पाटील यांनी स्वागत केले. (latest marathi news)

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अशोक मुर्तडक, अतुल चांडक, सुदाम कोयडे आदीसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. कळवम तालुक्याच्यावतीने इश्वर कदम, मयुर जोशी, पंकज बेनके, दत्तु बर्डे, पंकज पगार यांनी तर ग्रामपंचायतीच्यावतीने संदीप बेनके, राहूल बेनके आदींनी स्वागत केले. राज ठाकरे हे वर्ष- दोन वर्षातून नियमित गडावर हजेरी लावतात. दरम्यान आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही आदिमायेचे दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT