Navratri 2024: Sakal
नाशिक

Nashik Navratri 2024 : आदेश झुगारून रात्री दहानंतरही दणदणाट; दांडिया आयोजकांची मनमानी

Latest Marathi News : रात्री दहा वाजेनंतर बहुतांशी मंडळांच्या रासदांडियात डीजेचा दणदणाट सुरू होता. यातून आयोजकांचा मनमानीपणा निदर्शनास आला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून, त्या पार्श्वभूमीवर शहराच्या उपनगरांमध्ये मंडळांकडून रासदांडियाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र, पोलिसांच्या आदेशाला झुगारून शुक्रवारी (ता. ४) रात्री दहा वाजेनंतर बहुतांशी मंडळांच्या रासदांडियात डीजेचा दणदणाट सुरू होता. यातून आयोजकांचा मनमानीपणा निदर्शनास आला. नवरात्रोत्सवात गरबा-रासदांडिया खेळण्यासाठी युवा वर्गांसह महिलांमध्ये मोठा उत्साह असतो. (Disobeying orders and making noise even after 10 pm of dandiya Organisers )

तर पोलीसांनी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच मंडळ व गरबा-रासदांडियांचे आयोजन करणार्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रात्री दहा वाजता रासदांडिया बंद करणे आवश्यक होते. परंतु नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रासदांडिया खेळण्यासाठी फारशी गर्दी नव्हती. परंतु दुसर्या माळीला (ता.४) रात्री आठ वाजेपासून गरबा-रासदांडिया खेळण्यासाठी गर्दी होऊ लागली.

पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार रात्री दहा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी होती. असे असतानाही उपनगरीय परिसरातील बहुतांशी रासदांडियाच्या ठिकाणी रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू होता. या सुरू असलेल्या रासदांडियाच्या आयोजकांना पोलिसांकडून कोणतीही तंबी देण्यात न आल्याचे आश्चर्य जागरुक नागरिकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT