Tribal youths at Vavi Kashai Devi temple  esakal
नाशिक

Navratri 2024 : आदिवासी युवक धावले 120 किलोमीटर अनवाणी पायांनी; वावीच्या काशाई देवीच्या मंदिरातील दीपप्रज्वलन

Latest Navratri News : काशाई देवी मंडळाच्या सुमारे 30 सदस्यांनी 120 किलोमीटरचे अंतर अनवाणी पायांनी धावत रात्रीतून पार केले.

अजित देसाई

सिन्नर : तालुक्यातील वावी येथील काशाई देवी मंडळाच्या सुमारे 30 सदस्यांनी 120 किलोमीटरचे अंतर अनवाणी पायांनी धावत रात्रीतून पार केले. नेवासा तालुक्यातील वरखेड येथील लखाबाई या आदिवासी देवतेच्या मंदिरात मशाल प्रज्वलित करून वावी येथे आणण्यात आली. या ज्योतीने मंदिरातील दिवा प्रज्वलित करून आदिवासी बांधवांनी नवरात्र उत्सवात प्रारंभ केला. आदिवासी भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या लखाबाई उर्फ महालक्ष्मी देवीचे मूळ स्थान नेवासा तालुक्यातील वरखेड येथे आहे. (Tribal youths run 120 kilometers barefoot lighting lamp at Vavi Kashai Devi temple)

वावी गावातील आदिवासी बांधव काशाई देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करतात. त्यासाठी गेल्या बारा वर्षांपासून लखाबाईच्या मंदिरातून मशाल प्रज्वलित करून आणली जाते. ही मशाल दसऱ्यापर्यंत वावी येथील मंदिरात तेवत असते. बुधवारी दुपारी बारा वाजता खाजगी वाहन व सोबतीला दोन दुचाकी घेऊन आदिवासी वस्तीतील सुमारे 30 तरुण नेवासा कडे रवाना झाले. रात्री दहा वाजता लखाबाई मंदिरात महाआरती झाल्यावर मशाल प्रज्वलित करून हे तरुण अनवाणी पायांनी पळत परतीच्या प्रवासाला निघाले. (latest marathi news)

तत्पूर्वी धावणाऱ्या या सर्व तरुणांनी देवीच्या मंदिरात स्नान करून मनोभावे पूजा केली होती. परतीच्या प्रवासात नेवासा, श्रीरामपूर, राहता, जवळके या मार्गे मशाल आणण्यात आली. तीन ते चार किलोमीटर अंतर प्रत्येक तरुण धावला. त्यांच्यासोबत दोन दुचाकी मागेपुढे होत्या तर इतर तरुण पिकप जीप मधून काही अंतर पुढे जात होते. दुपारी बारा वाजता हे सर्व करून वावी येथे दाखल झाले. गावाच्या विशेष आदिवासी परंपरेप्रमाणे त्यांचे पाय धुवून व पूजा करून स्वागत करण्यात आले. गावातील मुख्य मार्गाने मशाल फेरी काशाई देवी मंदिरात नेण्यात आली. तेथे मंदिरातील दीपप्रज्वलन करून नवरात्र उत्सवात प्रारंभ करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT