defaulters esakal
नाशिक

Nashik News : जिल्हा बॅंकेच्या सामोपचार योजनेतून 8 कोटींची वसुली; थकबाकीदारांनी घेतला योजनेत सहभाग

Nashik News : साडेसहाहजार थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेण्याची तयारी दर्शविली असून यातील १९४ थकबाकीदारांनी योजनेला लाभ घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर परवाना धोक्यात सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून थकबाकी वसुलीसाठी शासनाच्या आदेशान्वये बनविलेल्या अॅक्शन प्लॅनमध्ये शेतकऱ्यांसाठी एकरक्कमी थकबाकी जे भरू शकत नाही, त्यांच्यासाठी सामोपचार योजनेची घोषणा करण्यात आली. (Nashik News Recovery from District Bank Samopchar Yojana)

या योजनेला थकबाकीदार शेतकऱ्यांकडून प्रतिसाद दिला असून आतापर्यंत ८ कोटींची वसुली झाली आहे. साडेसहाहजार थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेण्याची तयारी दर्शविली असून यातील १९४ थकबाकीदारांनी योजनेला लाभ घेतला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेचा परवाना अडचणीत सापडला.

त्यामुळे बॅंकेला वाचविण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. त्यावर गतवर्षात त्यांच्या दालनात बैठक झाली. विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन ‘नाबार्ड’ ने बँकेस शासनाच्या मदतीने ‘आरबीआय’चे निकष पूर्ण करण्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, सहकार आयुक्त, नाबार्ड, सहकारमंत्री यांच्याबरोबर बैठका झाल्या. यात ठेवीदारांच्या हितासाठी व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नियमित कर्जपुरवठा होण्यासाठी तातडीने कृती आराखडा शासनाच्या मार्फत नाबार्ड यांना सादर करावा, अशा सूचना झाल्या.

यानंतर बॅंक प्रशासनाने मोठ्या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना सुरू करीत त्यास सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली. मान्यता झाल्यावर ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली. ही योजना लागू होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. सुरवातीला योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

मात्र, त्यानंतर प्रशासक प्र. बा. चव्हाण यांनी फिल्डवर उतरत, दिंडोरी, मालेगाव व कळवण तालुक्यात बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठका घेत, जनजागृती केली. परिणामी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून योजनेबाबत विचारणा करू लागले आहेत. योजनेचे फायदे थकबाकीदारांना समजून सांगितले जात आहे.

प्रत्यक्षात १९४ थकबाकीदार सभासदांनी योजनेला लाभ घेत यातून ७.८० कोटींची वसुली झाली आहे. यापूर्वी जिल्हा बँकेचे कोट्यवधींचे कर्ज करण्यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना राबविण्यात आली होती. यात १४८४ थकबाकीदारांनी ७१.२७ कोटींची वसुली झाली होती. ही वसुली सरासरी २५ टक्के होती. दरम्यान, नवीन समोपचार योजनेला थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी केले आहे.

४० हजार ४५ थकबाकीदार सभासद पात्र

या योजनेसाठी ४० हजार ४५ थकबाकीदार सभासद पात्र असून त्यांच्याकडे एकूण २०३४ कोटींची थकबाकी आहे. यातील २० हजार ४१२ सभासदांनी प्रत्यक्ष भेटी देऊन योजनेची माहिती घेतली आहे. यातील ६ हजार ४३९ इच्छुकांनी योजनेत सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी काही महिन्यांचा अवधी मागून घेतला आहे. प्रामुख्याने द्राक्ष निघाल्यानंतर यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

योजनेचा लाभ घेतलेले तालुकानिहाय सभासद (कंसात सभासद संख्या)

दिंडोरी (२५) १.५२ कोटी, निफाड (२२) १.२३ कोटी, मालेगाव (१९) ८० लाख , येवला (२३) १.०२ लाख, सटाणा (२६) ६५ लाख, कळवण (३१) ६९ लाख, सिन्नर (१३) २८ लाख, चांदवड (१०) ३५ लाख, नांदगाव (१) २ लाख, नाशिक (४) ४७ लाख, देवळा (१२) ३८ लाख, त्र्यंबकेश्वर (६) ३८ लाख, इगतपुरी (२) १ लाख, पेठ व सुरगाणा (०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT