Nashik ZP  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि.प.कनिष्ठ सहाय्यक परीक्षेचा निकाल घोषित

Nashik ZP : ‘कनिष्ठ सहाय्यक’ या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवारी (ता.२१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने १८, १९ व २० डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या ‘कनिष्ठ सहाय्यक’ या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवारी (ता.२१) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला आहे.

हा निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. (Junior Assistant Exam Result Declared)

‘कनिष्ठ सहाय्यक’ या पदाच्या २२ जागांकरिता ऑनलाइन परीक्षा झाली होती. परीक्षेला एकूण २ हजार ६६७ परीक्षार्थीनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यापैकी १ हजार ७४२ परीक्षार्थींनी परिक्षा दिली होती.

२०० गुणांच्या परीक्षेत किमान ४५ टक्के म्हणजे ९० गुण प्राप्त करणाऱ्या ९०६ परीक्षार्थींचा निकाल घोषित झाला आहे. यातून प्रारूप निवडयादी व प्रारूप प्रतीक्षायादी तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल.

त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT