नाशिक

निफाडचा पारा ११ अंशांवर, नाशिकला १२.६ अंश तापमान

CD
३०-२ निफाड येथे पारा ११ तर, नाशिकला १२.६ अंशावर ---- थंडीचा जोर वाढतोय ः हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१५ ः पाऱ्यातील घसरण सुरु असल्‍याने रोजच हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. सातत्‍याने पारा घसरत असताना, नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. रविवारी (ता.१५) निफाडचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. भारतीय हवामानशास्‍त्र विभागाने जारी केलेल्‍या दैनंदिन अहवालानुसार, राज्‍यातील मोठ्या शहरांमध्ये पुण्याचे किमान तापमान (१२.१ अंश सेल्सिअस राज्‍यात नीचांकी किमान तापमान म्‍हणून नोंदविले गेले आहे. त्‍याखालोखाल नाशिकचे किमान तापमान निच्चांकी आहे. हवामान कोरडे राहाण्याची शक्‍यता असल्‍याने, पुढील काही दिवसांत पारा आणखी घसरत जाण्याची शक्‍यता आहे. आठवड्याभरात जेमतेम दोन अंश सेल्सिअस तापमान घसरले असले तरी, कमाल तापमानात मात्र मोठी वाढ झाली आहे. त्‍यामुळे दिवसा चटका वाढत असून सायंकाळनंतर गार वाऱ्यामुळे तापमानात मोठी घसरण होत असल्‍याने थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवते आहे. रविवारी नाशिकचे किमान तापमान १२.६ अंश सेल्सिअस नोंदविले असले तरी, कमाल तापमान मात्र ३१.६ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. दोन्‍ही तापमानात मोठी तफावत सध्या दिसते आहे. संपूर्ण राज्‍यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

SCROLL FOR NEXT