NMC Nashik  esakal
नाशिक

Nashik Hospital Inspection : शहरातील रुग्णालयाची उद्यापासून तपासणी! 38 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त

Latest Nashik News : शहरामध्ये ६०० हून अधिक रुग्णालय आहे. दरवर्षी रुग्णालयांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Hospital Inspection : महात्मानगर येथे अनधिकृतपणे खासगी रुग्णालय चालविले जात असल्याची बाब समोर आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांना १५ रुग्णालय तपासणीचे उद्दिष्टही देण्यात आले आहे. (NMC Inspection of city hospital from tomorrow)

शहरामध्ये ६०० हून अधिक रुग्णालय आहे. दरवर्षी रुग्णालयांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, त्याशिवाय शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे रुग्णालय चालविली जात असल्याची बाब काही दिवसांपूर्वी महात्मा नगर येथील एका प्रकारावरून समोर आली होती.

शहराचा विस्तार वाढत असताना झोपडपट्टी व आर्थिक सक्षमता नसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात छोट्या घरांमध्ये रुग्णालय चालविली जात असून सक्षम पदवी नसताना देखील रुग्णांवर उपचार केले जात आहे या संदर्भात वैद्यकीय विभागाकडे अनेक तक्रारी केल्यानंतर महापालिकेचा वैद्यकीय विभाग सर्वांच्या रडारवर आला.

तसेच महात्मा नगर येथील पंड्या रुग्णालयावर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर वैद्यकीय विभाग जागा झाला असून बुधवार (ता.२५) पासून शहरातील रुग्णालयांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या ३८ अधिकाऱ्यांना सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १५ रुग्णालय तपासण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (latest marathi news)

या तपासणीमध्ये रुग्णालयाची नोंदणी, महापालिकेकडे नोंदणी असलेले रुग्णालयाचे बेड व प्रत्यक्षात असलेले बेड यासंदर्भात पाहणी केली जाणार आहे. कोराना काळामध्ये रुग्णालयात दर्शनी भागात दरसूची लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याची देखील अंमलबजावणी होते की नाही याबाबत पाहणी केली जाणार आहे.

"शहरातील रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी ३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथक नियुक्त करण्यात आले आहे. रुग्णालय संदर्भात अपूर्णता आढळल्यास नोटीस देऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले जाईल."- डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 नंतर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला मुक्त करणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या...

Mumbai News: पुनर्विकासात मोठा गेमचेंजर! वरच्या मजल्यावरील रहिवाशांना घर मिळणार, पण अट तळमजल्याच्या पात्रतेची

Kishori Pednekar: केवळ १५०० रुपयांनी महिलांना संरक्षण मिळणार नाही, किशोरी पेडणेकर यांची टीका

उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

IPL 2026: "काका, काळजी नको, पुढच्या वेळी हेल्मेट देऊ!" प्रिती झिंटाने जखमी चाहत्याची चौकशी करताना केली थट्टा; Video Viral

SCROLL FOR NEXT