नाशिक

स्विकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

CD
टूडे साठी ------------ स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब २० नोव्हेंबरच्या महासभेत होणार अधिकृत घोषणा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : महापालिकेतील नामनिर्देशित नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिका प्रशासनाकडून १० नामनिर्देशित सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना- मनसे आघाडीला दोन, तर शिवसेना (उबाठा)- काँग्रेस आघाडीला दोन जागा मिळणार आहेत. अधिकृत घोषणेनंतर नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब होणार आहे. जानेवारीत महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात ३१ प्रभागांतून एकूण १२२ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिका अधिनियमानुसार नामनिर्देशित सदस्यांची संख्या एकूण निवडून आलेल्या सदस्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक नसावी किंवा दहा सदस्यांपेक्षा अधिक नसावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार दहा नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. न्यायालयाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार सहा आठवड्यांच्या आत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने राजकीय पक्षांच्या संख्याबळाचा विचार करून नामनिर्देशित सदस्यांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया केली. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षांच्या संख्याबळानुसार नामनिर्देशित सदस्यांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर संबंधित पक्ष व आघाड्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची छाननी करून दहा उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. छाननीनंतर दहा अर्ज वैध ठरविण्यात आले, तर काँग्रेसकडून भाजपच्या उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु छाननी समितीने गटनेत्यांच्या प्रस्ताव ग्राह्य धरतं काँग्रेसचे पत्र फेटाळले. आता येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या महासभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतर नगरसेवक पदावर शिक्कामोर्तब होणार आहे. ---------------- नामनिर्देशित सदस्यांसाठी प्रस्तावित नावे - शिवसेना (उबाठा) - हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड. - शिवसेना- चंद्रकांत लवटे, विनायक आढाव. - भाजप- रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, चंद्रशेखर पंचाक्षरी. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT