On the occasion of Mahashivratri, a large crowd of devotees gathered on Friday to have darshan of Lord Mahadev. the Shivlinga decorated on Friday at Someshwar.
On the occasion of Mahashivratri, a large crowd of devotees gathered on Friday to have darshan of Lord Mahadev. the Shivlinga decorated on Friday at Someshwar. esakal
नाशिक

Maha Shivratri 2024: जय त्रिलोकनाथ शंभू, हे शिवाय शंकरा ! महाशिवरात्रीनिमित्त नाशिक शहरात ‘बम बम भोले’चा गजर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाशिवरात्रीचे (Maha Shivratri 2024) औचित्य साधत शुक्रवारी (ता. ८) शिवभक्तांमध्ये अलोट उत्साह होता. शहरातील प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेवासह सोमेश्‍वरला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सोमेश्‍वरला तर दहा वर्षांत प्रथमच एवढी गर्दी पाहिल्याची प्रतिक्रिया विश्‍वस्तांसह भाविकांनी नोंदविली, यावरून गर्दीची कल्पना यावी. (nashik occasion of Maha Shivratri 2024 marathi news)

शहरासह विविध उपनगरे, ग्रामीण भागातही शिवरात्रीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटीतील प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव म्हणजे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान. या ठिकाणी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर दर्शन रांगा थेट इंद्रकुंड मार्गापर्यंत पोचल्या होत्या.

सुरक्षेच्या कारणास्तव कपालेश्‍वर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंगद्वारे बंदीस्त करण्यात आले होते. याशिवाय शहरातील शर्वायेश्‍वर महादेव, नारोशंकर, सिद्धेश्‍वर, तारकेश्‍वर, अर्धनारी नटेश्‍वर, टाळकुटेश्‍वर महादेव, तीळभांडेश्‍वर, निळकंठेश्वर आदी मंदिरांमध्ये दिवसभर मोठी गर्दी होती.

हिरावाडी परिसरातील बेलेश्‍वर महादेव मंदिरात आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे रुद्र अभिषेक व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवपार्वती विवाह सोहळा

तपोवनातील संत जनार्दन स्वामी आश्रमातील शर्वायेश्‍वर महादेव मंदिरात पहाटे पूजा, अभिषेक, महाआरती, पालखी, सत्संग व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय नांदूर घाटावरील निलकंठेश्‍वर महादेव, मानूर येथील शिवगंगा, दिंडोरी रोडवरील सिद्धकलेश्‍वर महादेव मंदिरात दुग्धाभिषेक, लघुरुद्राभिषेक, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, शिवपार्वती विवाह सोहळा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. (Latest Marathi News)

श्री कपालेश्‍वराचा पालखी सोहळा रंगला

प्राचीन श्री कपालेश्‍वर महादेव मंदिरात पहाटे चारच्या अभिषेकाने सोहळ्यास आरंभ झाला. त्यानंतर दुपारी एक वाजता दुग्धाभिषेक झाल्यावर साडेतीन वाजता श्रींच्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक मार्गाने सवाद्य पालखी सोहळा मार्गस्थ झाला.

यावेळी शिवभक्तांत मोठा उत्साह होता. श्री कपालेश्‍वर महादेव मंदिरातर्फे महाशिवरात्रीनिमित्त पंचमुखी चांदीच्या मुखवट्याचा पालखी सोहळ्याचे वाटेत महिलांनी सडा रांगोळीने स्वागत केले. कपालेश्‍वर मंदिरापासून सुरू झालेला हा सोहळा पुढे मालवीय चौक, शनी चौक, श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.

वाटेत महिलांनी पालखीतील श्रींच्या मुखवट्याचे विधिवत पूजन करत दर्शन घेतले. हा सोहळा सायंकाळी रामतीर्थावर पोचल्यावर अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा पालखी सोहळा पुन्हा मंदिरात पोचल्यावर आरती झाली. त्यानंतर रात्री बारा वाजता महाशिवरात्रीच्या विशेष महापूजेस प्रारंभ झाला. (Latest Marathi News)

सोमेश्‍वरला दहा वर्षातील गर्दीचा उच्चांक

शहरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गाच्या सानिध्यातील श्री सोमेश्‍वर महादेवाच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या कायम होत्या. दरम्यान येथील यात्रोत्सवानिमित्त हजारो रुपयांची उलाढाल झाली.

गोदातीरावरील श्री सोमेश्‍वर महादेव मंदिरात भाविकांची वर्षभर वर्दळ असते. पहाटेच्या काकड आरतीनंतर भाविकांच्या दर्शनरांगा दूरवर पोचल्या होत्या. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. पहाटे विश्‍वस्तांच्या उपस्थितीत काकडआरती झाली. त्यानंतर दुपारी पालकमंत्री दादा

भुसे यांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. या वेळी समता ब्लड सेंटरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गत दहा वर्षात इतकी गर्दी प्रथमच अनुभवण्यास मिळाल्याची प्रतिक्रिया विश्‍वस्तांनी नोंदविली.

श्री सोमेश्‍वर महादेव मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी होती. दुपारनंतर गर्दीचा उच्चांक झाला. महाशिवरात्रीनिमित्त येथे भरलेल्या यात्रोत्सवातून हजारो रुपयांची उलाढाल झाली. यात खेळणीसह खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सला मोठा प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT