Nashik Goda Aarti  esakal
नाशिक

Nashik Goda Aarti : गोदाआरतीच्या कामांचा विरोध मावळणार; जिल्हाधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणार

Nashik News : गोदावरी आरतीसाठी शासनाने दिलेल्या साडेअकरा कोटींच्या कामाला गोदातीरावरील काही लोक ‘खो’ घालत असल्याची तक्रार करत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोदावरी आरतीसाठी शासनाने दिलेल्या साडेअकरा कोटींच्या कामाला गोदातीरावरील काही लोक ‘खो’ घालत असल्याची तक्रार करत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने बुधवारी (ता. ३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी दोन दिवस स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून काम चालू करणार असल्याची ग्वाही त्यांनी सेवा समितीला दिल्याचे जयंत गायधनी यांनी दिली. (Opposition to Goda Aarti works will subside)

रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी नदीची आरती करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर ठेवला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत त्यांनी तातडीने गोदाआरतीच्या कामांसाठी अकरा कोटी ६० लाख रुपये मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध करत कामास प्रारंभ केला.

रामतिर्थावर चौथऱ्‍याची बांधणी सुरु असतानाच हे काम स्थानिकांनी थांबवले आहे. त्यामुळे पुढील कामे एलईडी स्क्रीन, लायटिंग, विद्युत रोषणाई या सर्वं कामे रखडली आहेत. शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या निविदांच्या कामांना विरोध केला जात आहे. (latest marathi news)

शासनाने यात लक्ष घालून तातडीने या कामाला गती द्यावी, अशी मागणी रामतीर्थ सेवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्‍यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांत आपण स्वत: प्रत्यक्ष गोदाआरती स्थळावर येऊन या कामाला शुभारंभ करणार आहे.

शासनाने सुरू केलेले काम बंद होऊ शकणार नसल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्‍यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे प्रमुख जयंत गायधनी, प्रफुल्ल संचेती यांसह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT