strike esakal
नाशिक

Nashik News : अंशकालीन स्त्री परिचरांचा 1 ऑक्टोबरला जेलभरो

Nashik : जिल्ह्यात १ ऑक्टोबरला काळी साडी परिधान करून अंशकालीन स्त्री परिचरांतर्फे सहकुटुंब जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य सरकार अंशकालीन स्त्री परिचरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात १ ऑक्टोबरला काळी साडी परिधान करून अंशकालीन स्त्री परिचरांतर्फे सहकुटुंब जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीची बैठक राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. बैठकीत राज्य सरकारकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. (Part time female attendant jailed on October 1)

सर्व जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचरांनी या वेळी मते मांडली. राज्य सरकारच्या मंत्र्यांची आपापल्या जिल्ह्यात भेट घेऊन निवेदन द्यावे. प्रत्येक जिल्ह्यात १ ऑक्टोबरला अंशकालीन स्त्री परिचरांतर्फे सहकुटुंब जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंशकालीन स्त्री परिचरांना दरमहा फक्त तीन हजार रुपये मिळतात. १०० रुपये केंद्र सरकार व २९०० रुपये राज्य सरकार देत आहे. गत ३५ वर्षे काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर पूर्णवेळ काम करतात. मात्र, मोबदला अल्प दिला जातो. (latest marathi news)

आरोग्य विभागाने अंशकालीन स्त्री परिचरांना कर्मचारी दर्जा द्यावा, अर्धवेळचे २१ हजार रुपये मोबदला द्यावा, त्यांना कायम करावे, वरील निर्णय आचासंहितेपूर्वी त्वरित घ्यावा. राज्यभर १२ हजार अंशकालीन स्त्री परिचर कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात १ ऑक्टोबरला सकाळी अकराला जिल्हा परिषद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षा चित्रा जगताप, हसीना शेख, राजू निकम, बेबी सोळसे, सुनीता शेलार आदींनी केले आहे. निवडणूक आचासंहितेपूर्वी अंशकालीन स्त्री परिचरांना न्याय मिळालाच पाहिजे, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT