While welcoming Sandesh Jagtap, General Secretary of MVP Adv. Nitin Thackeray. esakal
नाशिक

Nashik News : दप्तराचे ओझे कमी करणाऱ्या 'स्मार्ट बॅग'ला पेटंट!

Nashik News : होरायझन इंटरनॅशनल ॲकॅडमीतील विद्यार्थ्याने ‘डिजिटल स्मार्ट बॅग’ची डिझाईन साकारली आहे व त्‍यासाठी पेटंट मिळविल्‍याचा दावा त्‍याने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाळकरी विद्यार्थ्यांच्‍या जिव्‍हाळ्याचा अन्‌ तितक्‍याच चिंतेचा विषय म्‍हणजे दप्तराचे ओझे. हे दप्तराचे ओझे करण्यासाठी शाळांपासून तर शासनापर्यंत विविध स्‍तरांवर उपाययोजना केल्‍या जात आहेत. या प्रयत्‍नांना हातभार लावताना मविप्र संस्‍थेच्‍या अश्विननगर येथील होरायझन इंटरनॅशनल ॲकॅडमीतील विद्यार्थ्याने ‘डिजिटल स्मार्ट बॅग’ची डिझाईन साकारली आहे व त्‍यासाठी पेटंट मिळविल्‍याचा दावा त्‍याने केला आहे.

इयत्ता नववीत शिकणाऱ्या संदेश जगताप याने ‘डिजिटल स्मार्ट बॅग’ ची डिझाइन तयार केली आहे. भविष्यात ही ‘बॅग’ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा या ‘स्मार्ट बॅग’च्या डिझाइनचे पेटेंट नुकतेच संदेशच्या नावे भारत सरकारच्या पेटेंट कार्यालयाकडे नोंदविले गेले असून, तसे प्रमाणपत्रही त्याला प्राप्त झाले असल्‍याची माहिती दिली आहे.

सध्या प्रत्येक पाल्य आणि पालकांना सतावणारा प्रश्न म्हणजे दप्तराचे ओझे आहे. दप्तराच्‍या ओझामुळे विद्यार्थ्यांना आरोग्‍यविषयक प्रश्‍न निर्माण होत आहेत. त्‍यामुळे हा सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. यावर तोडगा काढताना संदेश जगताप याने अनोख्या ‘स्मार्ट बॅग’ ची डिझाइन तयार केली. ही बॅग वजनाने हलकी असेल.

खांद्याला न लावता चाकांच्या मदतीने सहज ओढत नेता येऊ शकते. दप्तराच्या अतिरिक्त वजनामुळे विद्यार्थ्यांना होणारे मानेचे, पाठीचे आजार कमी करण्यास अशा प्रकारच्या ‘स्मार्ट बॅग’ची मदत होईल, असा विश्वास संदेशने व्यक्त केला. या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते संदेशला गौरविण्यात आले. शाळेच्या प्राचार्या रिचा पेखळे यांनीदेखील संदेशचे कौतुक केले. (latest marathi news)

वर्षभराच्‍या परिश्रमांचे फलित

बॅगची डिझाइन व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सतत एक वर्ष परीश्रम घ्यावे लागले. अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले. मविप्र संस्‍थेच्‍या औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयात प्राध्यापक असलेले संदेशचे वडील मनोज जगताप आणि मविप्रच्या आडगाव येथील औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयातील प्रा. अमोल देवरे यांचे त्‍याला सहकार्य लाभले.

अशी आहे बॅगची डिझाईन

स्मार्ट बॅगमुळे पालकांची दप्तराच्या ओझाची चिंता मिटेल. यासोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्नदेखील सुटेल. बॅगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याद्वारे शाळा सुटल्यानंतर पाल्य नक्की कुठे आहे, हेदेखील पालकांना मोबाईलवर तत्काळ समजेल.

"प्रयोगशील विद्यार्थ्यांसोबत त्‍यांच्‍यातील कल्पकवृत्ती आणि कलागुण हेरणारे शिक्षकदेखील संस्थेत कार्यरत आहेत. संस्थेकडून अशा विद्यार्थी, शिक्षकांच्या कलागुणांना वाव दिला जातो. संदेश जगतापने साकारलेला प्रकल्‍प कौतुकास्‍पद आहे." - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र संस्‍था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT