Citizens rush to buy plastic. esakal
नाशिक

Nashik News : प्लास्टिक कागद, ताडपत्रीच्या मागणी वाढ! गेल्यावर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी दर वधारले

Nashik News : प्लास्टिक कापड, ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांसह शेतकरी, उद्योजक यांच्याकडून दुकानांवर गर्दी केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मागील तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यासह शहरास अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. अवकाळी पावसात होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी प्लास्टिक कागद आणि ताडपत्रींची आवश्यकता भासत आहे. यामुळे प्लास्टिक कापड, ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांसह शेतकरी, उद्योजक यांच्याकडून दुकानांवर गर्दी केली जात आहे. (Plastic paper tarpaulin demand increase)

यामुळे कापड आणि तापडत्री यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक कमी मागणी अधिक असल्याने दरातही काहीशी वाढ झालेली आहे. दरवर्षी सहा ते सात जून नंतर पाऊस पडत असतो. यंदा मे महिन्यात अवकाळी पाऊस शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार हजेरी लावत आहे. मागील तीन ते चार दिवसात तालुक्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचेही नुकसान झाले आहे. अवकाळी पावसापासून शेती पिकांचा बचाव व्हावा. पॉलिहाऊस तसेच घरांना गळती लागून नुकसान होऊ नये. त्याचप्रमाणे शहरातही छोटे-मोठे व्यापाऱ्यांनी मागून ठेवलेला विविध प्रकारचा साहित्याचा साठा औद्योगिक क्षेत्रात कंपनी परिसरात तयार करून ठेवलेले उत्पादन पावसात भिजू नये.

याची खबरदारी घेत पाऊस पडताच शेतकरी, सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक कापड आणि ताडपत्री घेण्यासाठी भद्रकाली परिसरातील दुकानांवर गर्दी केली आहे. ग्रामीण भागातून अधिक मागणी आहे. शेतकऱ्यांचा त्यात अधिक समावेश आहे. आत्तापासूनच खरेदी विक्री सुरू झाल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त करण्यात आले. (latest marathi news)

प्लास्टिक कापडी विक्रीच्या सर्वच दुकाने ग्राहकांनी गजबजल्या आहे. खासकरुन रोल प्लास्टिकची सर्वाधिक विक्री होत आहे. त्यापाठोपाठ ताडपत्रींची विक्री होत आहे. वाहनधारकांकडूनही प्लास्टिक तसेच ताडपत्रीचे वाहन कव्हरची मागणी करत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे वाढलेली मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. यातच कच्च्या मालाचे दर वाढले आहे. त्यामुळे ताडपत्री आणि प्लास्टिक कागदाच्या दरात वाढ झाली आहे.

"गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापासूनच मागणी वाढली आहे. दरांमध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. सर्वच प्रकारच्या प्लास्टिक ताडपत्री मागणी होत आहे. सध्या आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती आहे." - अनिल बागुल, विक्रेता

असे आहेत दर

ताडपत्री प्रकार दर (रुपयांमध्ये)

पावसाळी प्लास्टिक ९० ते १४०

पातळ वर्जीन प्लास्टिक ३० ते १०० मीटर

जाड वर्जीन प्लास्टिक १५० ते १८० मीटर

सहा प्रकारची पावसाळी ताडपत्री १३० ते ६ हजार

नायलॉन ताडपत्री ७२० ते १ हजार ४००

प्लास्टिक रोल ८० ते १६० मीटर

नायलॉन दोरी १८० किलो

रेशीम, सूत दोरी बंडल ८० ते १८०

रिक्षा कव्हर ५५० पासून पुढे

दुचाकी कव्हर १५० ते ८५०

चारचाकी ६५० ते १ हजार ८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT