Tensed Farmer & PM Modi esakal
नाशिक

PM Modi Nashik Daura: कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचे ठिकाण बदलाची शक्यता; जिल्ह्यात असंतोष, पोलिसांच्या गोपनीय शाखेचा अहवाल?

Nashik News : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Daura : नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या १५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार आहे. परंतु कांदाप्रश्नावरून महायुतीच्या उमेदवारांना शेतकरी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्याचा परिणाम मोदी यांच्या सभेवरही होण्याची शक्यता असल्याचा गोपनीय अहवाल पोलिसांनी दिल्याचे समजते.

त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंतऐवजी नाशिकमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने चाचपणीही सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पोलीस महासंचालकांनीही ग्रामीण पोलिसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवरील तयारीबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केल्याचे कळते. (Nashik Onion issue likely to change venue of Modi meetin)

लोकसभा निवडणुकीचा प्रचार राज्यभरात शिगेला पोहोचला आहे. येत्या २० तारखेला नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूीवर पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी (ता.१५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासह पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य राजकीय नेत्यांच्या सभा व दौऱ्यांच्या बंदोबस्ताचाही आढावा यावेळी घेण्यात आला.या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा कांदा उत्पादक जिल्हा असून, कांद्यावरील निर्यातबंदीमुळ जिलह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महायुतीच्या उमेदवारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. विशेष शाखा व गोपनीय विभागानेही यासंदर्भातील माहिती पोलीस महासंचालकांना दिली आहे. परिणामी, पिंपळगाव बसवंत येथे मोदींच्या सभेची तयारी सुरु असली तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी नाशिक शहरात सभा घेण्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार चाचपणी केली जात असल्याचे समजते. (latest marathi news)

नियोजनाचा अभाव

पोलिस महासंचालकांनी दोन दिवसांपूर्वी अचानक भेट देत निवडणूक व पंतप्रधान मोदी यांची सभा यासंदर्भातील बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यावेळी ग्रामीण पोलीसांच्या बंदोबस्ताच्या नियोजनात मोठा अभाव निदर्शनास आल्याने पोलीस महासंचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळेही पंतप्रधान मोदी यांची नियोजित सभा शहरात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारवाईची शक्यता

पंतप्रधान मोदी यांची सभा बुधवारी असून, त्यापूर्वी शहर-ग्रामीण पोलिसांकडून कांदाप्रश्नी आंदोलन वा निदर्शने करणाऱ्या शेतकरी, कार्यकर्त्यांविरोधात कारवाईची शक्यता आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना नजरकैद केले जाण्याची शक्यता असून, तत्पूर्वी नोटीसाही बजाविल्या जातील असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT