Ajay Naik, elder brother Jadhav and others along with Mukesh Giri. esakal
नाशिक

Nashik News : मनोरुग्णाच्या मदतीसाठी ‘खाकी’ आली धावून! मुकेशला पाहून कुटुंबाला आले आनंदाश्रू

Nashik News : सहा महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या मनोरुग्णाच्या मदतीला ‘खाकी’तील देवदूत धावून आल्याने कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले.

सागर आहेर

चांदोरी : सहा महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या मनोरुग्णाच्या मदतीला ‘खाकी’तील देवदूत धावून आल्याने कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. एरवी अनेकांना कठोर वाटत असलेल्या खाकीच्या आड एक संवेदनशील माणूसही दडलेला असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, निफाड तालुक्यातील सायखेडा पोलिसांमुळे. काहींचे आयुष्य खूप संघर्षमय असते. संघर्ष अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करते. तर काहींना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे जगण्याची संधी मिळते. (police came to help psychopath Seeing Mukesh family shed tears of joy )

सुदैवाने जोधपूर (उत्तर प्रदेश) येथील मुकेश गिरी नावाच्या व्यक्तीच्या बाबतीतही हेच घडले. सहा महिन्यांपूर्वी ते त्यांच्या गावातून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. पण, ते कुठेही आढळून येत नव्हते. पोलिस म्हटले की सर्वसामान्य जनता थोडी घाबरते, बावरते. पोलिसांशी थोडे सुरक्षित अंतर राखूनच राहणे पसंत करते. पण, वर्दी खाकी असली तरी तीही माणसेच आहेत. त्यांनाही नातीगोती असतात. याचाच सुखद प्रत्यय आणून दिला निफाड तो तालुक्‍यातील सायखेडा पोलिसांनी. (latest marathi news)

चांदोरी-ओझर रोडवर २ ऑक्टोबर रोजी ३५ वर्षीय मनोरुग्ण व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली. रात्रीचे पेट्रोलिंग करताना पोलिस शिपाई संदीप लगड, मोठाभाऊ जाधव यांच्या ही बाब लक्षात आली. मनोरुग्णाची माहिती वरिष्ठांना देत त्यास सोबत घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे, पोलिस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, पोलिस नाईक मोठाभाऊ जाधव, पोलिस हवालदार अजय नाईक, पोलिस नाईक मंगेश गोसावी, पोलिस शिपाई संदीप लगड, पोलिस हवालदार गायकवाड यांनी सहकार्य केले.

मुकेशला मिळाला आधार

मनोरुग्ण मुकेशच्या अंगावरचे कसेबसे कपडे, डोक्यावर केस वाढले होते. स्वच्छता व औषधोपचार केल्यानंतर त्यास मानसिक आधार देत बोलते केले. त्यातून पुरेशी माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांसमवेत संपर्क साधला गेला. या व्यक्तीची माहिती घेतली असता ती व्यक्ती उत्तर प्रदेशमधील जोधपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्यांचे बंधू शुक्रवारी (ता. ४) जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मुकेशला आधार मिळाल्याने सर्वांनाचा हायसे वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT