Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : पुरुषांचा 41 तर, महिलांचा 39 ‘कटऑफ’! प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर

Nashik News : प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार खुल्या सर्वसाधारण गटात पुरुषांचा ४१ तर, महिलांचा ३९ गुणांपर्यंतचा कटअॉफ आहे. यामुळे स्पर्धा चुरशीची आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायांच्या रिक्त ११८ जागांसाठी झालेल्या भरतीची मैदानी चाचणी आटोपली असून आता लेखी परीक्षेसंदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. ७) होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी १:१० या प्रमाणात १ हजार ९९७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यासाठीचा प्रवर्गनिहाय कटऑफ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार खुल्या सर्वसाधारण गटात पुरुषांचा ४१ तर, महिलांचा ३९ गुणांपर्यंतचा कटअॉफ आहे. यामुळे स्पर्धा चुरशीची आहे. (Nashik Police Recruitment Category wise cutoff announced)

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ जागांसाठी ४ हजार ३७४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती. यातील २ हजार ९३९ उमेदवारांनी २५ पेक्षा अधिक गुण मिळविले. मैदानी चाचणीत किमान ५० टक्के म्हणजेच किमान २५ गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधूनच लेखी परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहे.

या उमेदवारांमधून १ हजार ९९७ उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (ता. ७) केटीएचएम महाविद्यालयात घेतली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना सकाळी सात वाजता बोलाविण्यात आले आहे. ग्रामीण पाेलीस दलाच्या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा भुजबळ नाॅलेज सिटी (मेट) काॅलेजमध्ये हाेणार आहे. (latest marathi news)

लेखी परीक्षेसाठी तात्पुरते पात्र उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी लेखी परीक्षेस बसणार नाही याची पडताळणी केली जाणार आहे. लेखी परीक्षा १०० गुणांची असून ९० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी येतांना चेस्ट नंबरचे पत्र सोबत आणावे. पेन व पॅड पुरविणार असून उमेदवारांनी मोबाईल अथवा कोणतेही इलेक्ट्रानिक गॅझेट सोबत आणू नये, असे आवाहन पाेलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

‘कटऑफ’ लिस्ट

* ओपन जनरल

पुरुष - ४१, महिला - ३९

* माजी सैनिक - ४०

* ओबीसी

पुरुष -३७, महिला - ३२

*एससी

पुरुष - २६, महिला - २५

*एसटी

पुरुष - ३६, महिला - ३२

* एसबीसी

पुरुष - २५, महिला - २५

* इडब्ल्यूएस

पुरुष - २५, महिला - २५

* एसईबीसी

पुरुष - २६,  महिला - २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT