Engineering Diploma Admission esakal
नाशिक

Engineering Diploma Admission : डिप्‍लोमा प्रवेश नोंदणीस मुदतवाढीची शक्‍यता

Diploma Admission : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमास प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Engineering Diploma Admission : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमास प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या अंतर्गत नोंदणीची मुदत मंगळवार (ता. २५)पर्यंत दिली आहे. पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नसून, नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता ही प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. (Possibility of extension of time for diploma admission registration)

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पार पडत असलेल्‍या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठीची गेल्‍या २९ मेस नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती. सध्या जाहीर झालेल्‍या वेळापत्रकानुसार मंगळवार (ता. २५)पर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. लॉगइनद्वारे नोंदणी करून विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्‍यासाठी ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्‍ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या सोयीच्‍या पर्यायाची निवड करता येणार आहे. (latest marathi news)

जुलैमध्ये पहिल प्रवेशफेरी

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार नोंदणीची मुदत संपल्‍यावर गुरुवारी (ता. २७) तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासंदर्भातील तक्रार, हरकत नोंदविण्याची मुदत २८ ते ३० जूनदरम्‍यान असेल. २ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्‍यानंतर कॅप राउंडची प्रक्रिया सुरू होईल. नोंदणीला मुदतवाढ दिल्‍यास या वेळापत्रकात बदल होण्याचीही शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT