On Nashik-Pune Highway Vs. Da. Potholes on Savarkar flyover. In the second photo, there are potholes and standing water on the road from Suburban Naka to Inglenagar. esakal
नाशिक

Nashik Potholes : नाशिक रोड परिसरात खड्डेच खड्डे; वाहनधारकांची कसरत

Potholes : नाशिक-पुणे महामार्गावरील वि. दा. सावरकर उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Potholes : नाशिक-पुणे महामार्गावरील वि. दा. सावरकर उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात उड्डाणपुलावर खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारक आणि दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. पुलावर साचलेल्या पाण्यातून वाहने जोरात गेल्यास पुलाखाली जाणाऱ्या पादचारी, दुचाकी वाहनधारकांवर पाणी उडते. (Potholes in Nashik Road area are problem for motorists )

त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जेल रोडला इंगळेनगर ते कन्याशाळेपर्यंत, तसेच उपनगर नाका ते इंगळेनगरपर्यंत जुन्या पाटाच्या रस्त्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे; परंतु खोदलेल्या खड्ड्यांमुळे, रस्त्यावरील पावसामुळे पुन्हा खड्डे झाले असून, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. चिखलामुळे दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. (latest marathi news)

जेल रोडला जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांवर डांबरीकरण केले नसल्याने खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहेत. कधी कधी अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करूनही डांबरीकरण झाले नाही. याबाबत शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सागर भोजने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT