Baglan Taluka Mahavikas Aghadi protest by locking the office of Public Works Department esakal
नाशिक

Nashik News: रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे; बांधकामला ठोकले टाळे! सटाण्यात महाविकास आघाडीकडून रिकाम्या खुर्चीला हार

Nashik News : पालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वच रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : पालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वच रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट होत आहेत. संबंधित ठेकेदारांनी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले असून, अपूर्ण कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता.११) सटाणा शहर महाविकास आघाडीचे पदाधिकारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी कौस्तुभ पवार अनुपस्थित होते. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्‍यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला. त्यानंतर कार्यालयास टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. (Nashik potholes on roads Maha Vikas Aghadi Satana marathi news psl98)

दुपारी बारा वाजता माजी आमदार संजय चव्हाण, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, विजयराज वाघ, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, अरविंद सोनवणे, शहरप्रमुख रवींद्र सोनवणे, अनिल सोनवणे, सुमित वाघ, चेतन पाटील, सौरभ सोनवणे आदींसह कार्यकर्ते बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात पोहोचले. मात्र, उपविभागीय अधिकारी कौस्तुभ पवार कार्यालयात गैरहजर होते. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला.

श्री.चव्हाण म्हणाले, शहरातील अत्यंत वर्दळीचा चौगाव रस्ता, डॉ.भुतेकर चौक परिसर यांसह विविध भागात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. संबंधित ठेकेदारांनी रस्त्याच्या कामांसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. (Latest Marathi News)

मात्र तीन महिने उलटूनही रस्त्यांची कामे आजही अपुर्णावस्थेतच आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकांना या खोदलेल्या रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर उच्च दर्जाची कामे करावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा श्री.चव्हाण यांनी दिला.

आंदोलनात दिनेश सोनवणे, शरद शेवाळे, राजनसिंह चौधरी, विलास सोनवणे, दादू सोनवणे, पोपट सोनवणे, रमेश सूर्यवंशी, केशव सोनवणे, किशोर ह्याळीज, सुरेश पगार, लक्ष्मण सोनवणे, युनूस मुल्ला, मयूर गुजर, रजा मुल्ला आदींसह नागरिक व कार्यकर्ते सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT