Vegetables  esakal
नाशिक

Vegetable Rate Hike : टोमॅटोला आले भाव, मिरचीचा ही ठसका; आठवडे बाजारात भाजीपाल्याची दरवाढ

Nashik News : पावसाळा सुरू होताच हिरव्या भाज्यांचे दर कडाडले आहेत. टोमॅटोच्या भावाला लाली चढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पावसाळा सुरू होताच हिरव्या भाज्यांचे दर कडाडले आहेत. टोमॅटोच्या भावाला लाली चढली आहे. मिरचीचा १०० रुपये किलो भावाचा ठसका नागरिकांच्या खिशाला जड झाला आहे. इतर भाजीपालाही ८० रुपये किलोपर्यंत पोचल्याने नागरिकांच्या खिशावर ताण पडत आहे. त्याचा पिंपळगावच्या आठवडे बाजारात नागरिकांच्या खरेदीवर परिणाम पाहायला मिळत आहे. (Price hike of vegetables in Pimpalgaon Baswant Week Market)

जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी पर्यत पोहचले नाही. त्यामुळे एप्रिल,मे महिन्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थोडीफार प्रमाणात लागवड केली होती.त्याचा परिणाम सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

यात प्रामुख्याने टोमॅटोचा भाव अधिक लालभडक झाला आहे.टोमॅटोचे भाव थेट ८० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचला आहे. तर भेंडी,गवार,वांदे,शेवगा यांचे दर ८० ते १०० रुपये किलोच्या पुढे सरकले आहे. (latest marathi news)

पालेभाज्यांनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांच्या घराचे बजेट कोलमडले आहे. मे महिन्यात टोमॅटोचे दर ३० रुपये किलो होते.पण दराला लाली चढून ८० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे.हिरव्या पालेभाज्यासुद्धा चांगल्याच कडाडल्या आहेत.

त्यामुळे सामान्यांच्या ताटातून भाजीपाला गायब होत आहे. अगं बाई...किती ही महागाई असे उद्गार भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या तोंडून निघत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT