PM Narendra Modi esakal
नाशिक

Nashik PM Narendra Modi : अन् कांदा विषयाला पंतप्रधानांनी घातला हात!

Nashik News : कांद्याच्या बाबतीत सरकार काम करत असून, दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्क्यांनी वाढल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरवातीला विरोधकांवर टीका केली. त्यांचे भाषण जोमात येत असतानाच एका तरुण शेतकऱ्याने ‘कांद्यावर बोला’ अशी घोषणाबाजी सुरू केला. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष याविषयाला हात घातला. नाशिक विभाग कांदा, द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. (Prime Minister Modi)

केंद्र सरकारने देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या साठवणुकीची व्यवस्था उभी केली. ही व्यवस्था पूर्वी कधी नव्हती. गेल्या वर्षी सात लाख टन कांदा खरेदी केला, तर यंदा पाच लाख टन कांदा खरेदीची सुरवात झाली आहे. कांद्याच्या बाबतीत सरकार काम करत असून, दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्क्यांनी वाढल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

श्री. मोदी म्हणाले, की आमच्या सरकारने दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठविली आहे. आतापर्यंत २२ हजार टनाहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे. ‘ऑपरेशन ग्रीन’च्या माध्यमातून देशभरात कांदा वाहतुकीसाठी अनुदान देण्यात आले आहे. ते धोरण लागू करण्यात येईल. यासह क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून द्राक्ष पिकासाठी द्राक्ष उत्पादकांसाठी योजना आणली आहे. (latest marathi news)

त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल, असे सांगत त्यांनी द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी सरकारची दहा वर्षे पाहिली. मात्र त्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने शेतकऱ्यांची चिंता केली नव्हती. आता १२ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मिळत आहेत. पाच वर्षांत ६० हजार रुपये मिळण्याची तरतूद केली आहे.

निर्यातीसाठी आम्ही अनुदानदेखील दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या सरकारने घोषणा व खोटे पॅकेज जाहीर झाले. मात्र मोदी शेतकऱ्याच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्य देत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT