Traffic jam at Bali Mandir Chowk. esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : उड्डाणपूल असूनही कोंडी फुटेना; बळी मंदिर चौकातील दृश्‍य : समस्या दिवसागणिक गंभीर

Nashik News : नाशिक शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. मुंबई महामार्गावरील बळी मंदिर चौकात वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. मुंबई महामार्गावरील बळी मंदिर चौकात वाहतूक कोंडी होत आहे. के. के. वाघ ते आडगावपर्यंत बांधण्यात आला आहे. उड्डाणपूलदेखील या चौकातील कोंडी पूर्णपणे फोडू शकला नाही, असे चित्र दिसून येते आहे. (problem of traffic congestion in city is increasing)

मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. मेरी रासबिहारी लिंक रोडवर बळी मंदिर चौकात दोन रस्ते जोडले जातात. या महामार्गावरील चौफुलीवर सर्व्हिस रोड असून यावरून नेहमी वाहनांची रेलचेल असते.

उड्डाणपुलावर जाण्यासाठी दोन रॅम्प आहेत. या चौफुलीवर येणारी वाहने सर्व्हिस रोड, दोन रॅम्प, मुख्य महामार्ग असे वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची गर्दी होते. या ठिकाणी कधी वाहतूक पोलिस असतात, तर काही वेळा नसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते.

बेशिस्तीमुळे कोंडी

मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूस हॉटेलसह इतर व्यावसायिकांची दुकाने व शोरूम आहेत. बळी मंदिर चौफुलीवर रासबिहारी शाळा, पुढे गार्डनजवळ के. के. वाघ संस्थेच्या कृषी महाविद्यालया, शाळा महाविद्यालये आहेत. महामार्गावरील दोन ही बाजूस झपाट्याने विस्तार झाला असून गृहसंकुले, बंगले, रो-हाऊस आहेत. (latest marathi news)

सदर भाग दाट लोकवस्तीचा असून स्थानिकांची याच मार्गाने मोठी वर्दळ सुरू असते. महामार्गाकडून वळून दिंडोरी रोडहून येणारी अवजड वाहने मेरी-रासबिहारी लिंक रोडवरून महामार्गाकडे जातात.

तसेच दिंडोरी रोडने महामार्गाने येणारी वाहने दिंडोरी रोड तसेच औरंगाबाद रोड कडेदेखील जात असतात. यामुळे ही वाहने समोरासमोर आल्याने अडकतात. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची भर पडते. तसेच सर्व्हिस रोडसह मुख्य मार्गाकडून येणारी वाहने बेशिस्तीने नेण्याचा चालकांच्या प्रयत्नात वाहने अडकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT