Police  esakal
नाशिक

Nashik News : स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या परिसरात मनाई आदेश लागू! परीक्षा केंद्रांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

Nashik Police Prohibitory Order : लोकसेवा आयोगाच्या वतीने भविष्यनिर्वाह विभागातील पर्सनल असीस्टंट आणि नर्सिंग ऑफिसर या पदांसाठीची परीक्षा रविवारी (ता. ७) घेतली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भविष्यनिर्वाह विभाग आणि नर्सिंग अधिकारी या क्षेत्रातील जागांसाठी रविवारी (ता. ७) लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. परिमंडळ एकमधील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे केंद्र असून, या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत. (Nashik Prohibitory order enforced in area of ​​competitive exam centers)

लोकसेवा आयोगाच्या वतीने भविष्यनिर्वाह विभागातील पर्सनल असीस्टंट आणि नर्सिंग ऑफिसर या पदांसाठीची परीक्षा रविवारी (ता. ७) घेतली जाणार आहे. ही परीक्षा सकाळी साडे नऊ ते साडेअकरा आणि दुपारी दोन ते सहा या वेळेत होणार आहे.

यासाठी परिमंडळ एकमधील पंचवटीतील सीडीओ मेरी हायस्कुल, भद्रकालीतील मातोश्री रामप्यारी भाई सारडा गर्ल्स हायस्कुल, वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कुल, डी.डी. बिटको बॉईज हायस्कुल, रविवार कारंजा येथील पेठे विद्यालय आणि गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॉलेज याठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. (latest marathi news)

परीक्षा काळात याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी परीक्षा केंद्राच्या १०० मीटरमध्ये रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्याचप्रमाणे, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर, टेलीफोन बुथ, फॅक्स, सायबर कॅफे, ध्वनीक्षेपक आदी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच, डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, कॅलक्युलेटर, वायरलेस सेट आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्यासह अग्निशस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भान्यसंनुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोलीस ठाण्यामार्फत कडेकोट पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT