‘वंचित’च्या आंदोलनापुढे अधिकारी नरमले sakal
नाशिक

नाशिक : ‘वंचित’च्या आंदोलनापुढे अधिकारी नरमले

लेखी आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांना दीर्घकाळाने का होईना न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकलहरे येथील विद्युत निर्मिती केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन आणि २० टक्के पूरक भत्ता मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीप्रणीत ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे पदाधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ८०० जणांनी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडले. त्याची गंभीर दखल घेत मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी मंगळवारी (ता. २७) हा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांना दीर्घकाळाने का होईना न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला.

एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रात बहुसंख्य कंत्राटी कामगार हे बहुजन आघाडी प्रणीत कामगार संघटनेशी सलंग्नीत आहेत. त्यांना नियमानुसार वेतन आणि पूरक भत्ता मिळवून देण्याची जबाबदारी म्हानिर्मिती कंपनीची असतानाही कंपनीतर्फे त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम त्यांच्यातर्फे होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बहुजन आघाडीप्रणीत कामगार संघटनेने यात लक्ष घातले.

चारवेळा चर्चा झाल्यानंतरही महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस पावले न उचलता अप्रत्यक्षपणे ठेकेदारांनाच झुकते माप देण्याचे धोरण सुरू ठेवल्याने शेवटी आम्हाला ठिय्या आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागले. अखेर त्याला यश आले, यात समाधान आहे. जे ठेकेदार ऐकणार नाहीत, कऱ्तत्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासनही मुख्य अभियंता शिंदे यांनी दिले.

- अविनाश शिंदे, महानगराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Warning : ‘’आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल’’ ; फडणवीसांचा विरोधकांना कडक इशारा!

Reliance AI: गुगल अन् 'मेटा'सोबत मिळून बनणार ‘रिलायन्स इंटेलिजन्स’, सर्वसामान्यांना असा मिळेल फायदा?

Maratha Reservation : मराठा आरक्षण मागणीसाठी भाजप आमदार आक्रमक; आमदार समाधान आवताडे यांनी केली विशेष अधिवेशनाची मागणी

Maratha Reservation Protest : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ, अटीशर्तींसह परवानगी

Latest Maharashtra News Updates live: मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...

SCROLL FOR NEXT