A representative of a private agency talking to protester Deepak Veljali at Pimperwadi toll road. esakal
नाशिक

Nashik: पिंपरवाडी टोलनाक्यावर आंदोलन चिघळले! NHAIचे दुर्लक्ष, वेलजाळींचे 2 दिवसांपासून धरणे; चर्चेसाठी खासगी एजन्सीचे प्रतिनिधी

Latest Nashik News : एजन्सीच्या प्रतिनिधींना निर्णय घेण्याचा किंवा लेखी खुलासा करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे पोलिसांनी देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जबाबदार प्रतिनिधीने येऊन आंदोलकाशी चर्चा करावी अशी सूचना केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर- शिर्डी महामार्ग रुंदीकरणासाठी मोबदला देऊन देखील असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी, प्रकल्पाच्या कामावरील मजुरांच्या वाहनाला झालेल्या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, शिर्डी महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन योग्य पद्धतीने करावे या मागणीसाठी पिंपरवाडी येथील टोल प्लाझावर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दीपक वेलजाळी यांनी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाकडे केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ते चिघळले आहे. (Protest raged at Pimperwadi toll booth)

महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक, तहसीलदार स्तरावर निवेदन देऊन देखील मागण्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने दोन दिवसांपासून दीपक वेलजाळी यांनी पिंपरवाडी येथील टोल प्लाझावर धरणे आंदोलन सुरू केले.

या आंदोलनास सायाळेचे सरपंच विकास शेंडगे, पाथरेचे माजी सरपंच मच्छिंद्र चिने, वावी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी, इलाहीबक्ष शेख, अरुण भरीतकर, नंदलाल मालपाणी, कन्हैयालाल भुतडा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित यंत्रणेने कागदावर आश्वासन देऊ नये, ठोस कार्यवाही करावी अशी मागणी श्री. वेलजाळी यांनी केली.

मात्र या आंदोलनाकडे दोन दिवस उलटून देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल घेतली नाही. प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे अथवा उप अभियंता दिलीप पाटील यांनी समक्ष येऊन मागण्यांसंदर्भातप्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका श्री. वेलजाळी यांनी घेतली आहे. एजन्सीच्या प्रतिनिधींना निर्णय घेण्याचा किंवा लेखी खुलासा करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे पोलिसांनी देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जबाबदार प्रतिनिधीने येऊन आंदोलकाशी चर्चा करावी अशी सूचना केली आहे. (latest marathi news)

‘न्हाई’ घालतेय पाठिशी...

महामार्गाच्या सफाई कामावर असलेल्या महिलांच्या वाहनाला अपघात झाला, त्यात काही मजूर मृत्युमुखी पडले तर बहुसंख्य जखमी झाले होते. या मजुरांमध्ये अल्पवयीन तसेच ज्येष्ठांचाही समावेश होता. या मजुरांची कोणतीही कायदेशीर नोंदणी करण्यात आली नव्हती.

अपघातानंतर या मजुरांच्या कुटुंबांना कोणतीही मदत देण्यात आली नाही. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी या अपघातास जबाबदार असलेल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वेलजाळी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT