Traffic was also disrupted on the highways including the service road on the highway esakal
नाशिक

Nashik Traffic News : पावसाने खोळंबली वाहतूक! मुंबई नाका, द्वारका, आडगाव नाका परिसरात कोंडी

Nashik Traffic : सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरीय रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Traffic News : महिनाभराच्या विलंबाने शहरात रविवारी (ता.३०) पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरीय रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. विशेषत: महामार्गावरील सर्व्हिसरोडसह महामार्गांवरही वाहतूक खोळंबल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावली. ( Rain has disrupted traffic in Mumbai Naka Dwarka and Adgaon Naka areas)

सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. अकरा वाजेनंतर मात्र पावसाचा जोर वाढला होता. या पावसामुळे शहरातील महामार्गाच्या उड्डाणपुलाखालील व सर्व्हिसरोडवर वाहतूक कोंडी झाली होती. बळी मंदिर चौफुलीवर वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहनांच्या सुमारे दोन किमी अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या. तर सर्व्हिसरोडने येणाऱ्या महामंडळाच्या बसेसमुळे कोंडीच आणखीच भर घातली. (latest marathi news)

ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अशीच स्थिती द्वारका चौकात झाली होती. चोहीकडून येणारी वाहने आणि पाऊस यामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडून पडली होती. तर, मुंबई नाका सर्कल याठिकाणीही तीच स्थिती होती. याशिवाय, पुणे महामार्गावरील दत्त मंदिर सिग्नलवरही कोंडी झाली.

लग्नाची दाट तिथी

महिनाभराच्या अस्तानंतर विवाह मुहूर्तांना सुरवात झाली आहे. रविवारी (ता. ३०) विवाहाची तारीख दाट होती. त्यामुळे शहरात परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्याही वाढली. परिणामी शहरात पाऊस सुरू असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांनी दुचाकीऐवजी चारचाकी वाहने रस्त्यावर आणली. त्यात विवाह सोहळ्यांसाठी येणाऱ्यांचीही वाहने रस्त्यावर आल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT