Waghad dam overflowed
Waghad dam overflowed esakal
नाशिक

Nashik Rain Update: दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर ओसरला; वाघाड धरण झाले ओव्हरफ्लो

दिगंबर पाटोळे

Nashik Rain Update : दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाचे दिंडोरी तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने करपु लागलेल्या खरीप पिकांना जिवदान मिळाले आहे.

तसेच तालुक्यातील नद्या नाल्यांना यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पूर येवून सर्वच पाझरतलाव तुडुंब झाले असून तालुक्यातील सहा धरणांपैकी वाघाड धरण शंभर टक्के भरले आहेत, तर अडीच महिन्यांपासून कोरडेठाक असलेल्या तीसगाव धरणात तीन दिवसात तीस टक्के पाणीसाठा झाल्याने धरण लाभक्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

त्यामूळे तुर्तास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून बळीराजाही आभाळमायेने सुखावला आहे. (Nashik Rain Update Rain subsides in Dindori taluka Waghad dam overflowed)

दिंडोरीच्या पश्चिम भागातील ननाशी, कोशिंबे मंडळामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे वाघाड धरण १०० टक्के भरले असून सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे परिसरातील वाघाड धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.

तर करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच्या पश्चिम परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसात असल्यामुळे करंजवण धरणातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवरून ८५ टक्के इतका झाला असून पावसाचा जोर दोन दिवस असाच राहिल्यास करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पामध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे हे सर्व पाणी पुणेगाव धरणात येत असल्याने पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून उनंदा नदीत पाण्याचा विसर्ग होत आहे.

त्यामुळे ओझरखेड धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. याशिवाय कादवा, कोलवण नदीसह छोट्या मोठ्या नाल्याचे पाणी पालखेड धरणात जमा होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहचला आहे.

त्यामुळे पालखेड धरणातून कादवा नदी पात्रात ६००० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. मात्र, रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सध्या या धरणातून ४१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदीत चालू आहे.

तर तिकडे आतापर्यंत कोरडे असलेल्या तिसगाव धरणामध्ये हळूहळू पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्के इतका झाल्यामुळे पाणी योजनेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर दोन दिवस असाच राहिल्यास तालुक्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यासह चांदवड, येवला, मनमाड, निफाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उतसाहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा

करंजवण ८५ टक्के

पालखेड ८२ टक्के

पुणेगाव ९४ टक्के

वाघाड १०० टक्के

ओझरखेड ७४ टक्के

तिसगाव ३० टक्के

ता. ०९/०९/२०२३ रोजी (२४ तासात झालेला पाऊस)

दिंडोरी ८०.०० मिमी, रामशेज ७३.६ मिमी, ननाशी १२१.०० मिमी, उमराळे ८७.०० मिमी, लखमापूर ७५.००, मिमी कोशिंबे ११५.०० मिमी, मोहाडी ६१.०० मिमी, वरखेडा ८८.०० मिमी, कसबे वणी ८३.०० मिमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT