Raj Thackeray Nashik Daura  esakal
नाशिक

Raj Thackeray Nashik Daura : राज ठाकरे 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर

Nashik News : राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असून दौऱ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांची संवाद साधणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असून दौऱ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या आषाढी वारीत सहभागी वारकऱ्यांची संवाद साधणार आहेत. या माध्यमातून ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या नारळ फोडला जाण्याची चर्चा सुरू आहे. (Raj Thackeray on 2 day visit to Nashik)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर युवा नेते अमित ठाकरेदेखील दौऱ्यात सहभागी होणार आहे. बुधवारी (ता. १९) संध्याकाळी सहा वाजता त्यांचे आगमन होईल गुरुवारी (ता. २०) त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतील. त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याला भेट देणार आहेत. त्यापूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. (latest marathi news)

या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एकला चलो रे‘ ची भूमिका घेण्यात आली असून जवळपास दोनशे जागा लढण्याचे निश्चित झाले आहे.

या निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणूनच राज ठाकरे यांच्याकडून सहकुटुंब श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांची संवाद साधला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT