Postal Department recruitment esakal
नाशिक

Postal Department : फिल्ड ऑफिसर पदासाठी 24 थेट भरती!

Nashik News : नाशिक टपाल विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी फिल्ड ऑफिसर पदासाठी थेट मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक टपाल विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी फिल्ड ऑफिसर पदासाठी थेट मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २४) रोजी सकाळी ११ वाजता प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहावे. (Recruitment through Interview on 24th July in Postal Department)

असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर नाशिक विभाग यांनी केले आहे. फिल्ड ऑफिसर पदासाठी सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाक सेवक आणि नमूद अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींची थेट मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी स्वखर्चाने येताना सेवानिवृत्त.

सेवामुक्त झाल्याचा पुरावा, ३ पासपोर्ट फोटो, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांचे कार्यालय, तसेच कोणत्याही डाक कार्यालयात इच्छुकांनी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच नियुक्ती होऊन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल. नंतर आयआरडीएआय (IRDAI) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येणार आहे. परवाना ५ वर्षासाठी वैध राहील. असे प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे. (latest marathi news)

आवश्यक पात्रता

-उमेदवार सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी,

कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाक सेवक असावा.

-सध्या कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा.

-उमेदवाराच्या कमाल वयाची अट नाही.

-फिल्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या अधिकारी,

कर्मचाऱ्यांविरोधात कुठलीही कार्यालयीन, अनुशासनात्मक चौकशी

प्रलंबित नसावी.

-उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत

पत्र सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

-उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक होणार आहे.

-कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संवाद कौशल्य,जीवन विमा

बाबतचे ज्ञान आवश्यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT