Vehicles and citizens passing through water. esakal
नाशिक

Nashik Godavari Flood : गोदावरी खळाळली, नदीकाठाच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Godavari Flood : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्क्यांवर पोचल्याने रविवारी (ता. ४) दुपारपासून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Godavari Flood : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्क्यांवर पोचल्याने रविवारी (ता. ४) दुपारपासून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. रामकुंडावरील छोटी-मोठे मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पुराचे पाणी आल्याने पूर बघण्यासाठी नाशिककरांनी एकच गर्दी केली. नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Residents of Godavari river bank alert due to flood)

तसेच सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. दरम्यान, पूजाविधी करण्यासाठी आलेल्या एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला. दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी (ता. ३) सायंकाळी पाचपासून ते रविवारी सायंकाळी पाचपर्यंत शहरात १०५.३ मिलिमीटर पाऊस पडला. रविवारी शासकीय सुटीमुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून सुटका मिळाली.

पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. गंगापूर रोडवर एक झाड पडल्याचे समजते. आवश्‍यक कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसामुळे त्रास सहन करावा लागला. तर व्यावसायिकांचे नुकसान झाले. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदूर गावातून शिवरे, करंजी, निफाड, दिंडोरी जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून ३६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गोदाकाठी पूजेसाठी आलेला यज्ञेश पवार हा युवक पुरात वाहून गेला आहे. पोलिस व एनडीआरएफची टीम त्याचा शोध घेत आहे. संततधार पावसामुळे आजारांना निमंत्रण मिळत असून, शहरात डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. (latest marathi news)

चांदोरी, सायखेड्यात पुराचे पाणी

गोदावरीचे पाणी आता वाढत असल्याने नदीकाठच्या चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. चांदोरी गावातील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली गेले असून, चांदोरी गावाच्या आजूबाजूची शेतीदेखील पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे.

गंगापूर धरणातील विसर्ग (क्यूसेक)

वेळ ...................... विसर्ग

दु. १२ .......... ५००

दु.२ ........... २०००

दु. ४ ............. ४०००

सायं. ६ ......... ६०००

नागरिकांनो, येथे साधा संपर्क

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ०२५३-२५७१८७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त डॉ. अशोक करंजकर, आपत्कालीन विभागप्रमुख स्मिता झगडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT