Nashik Lok Sabha Election esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : मनपाच्या 50 कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगामार्फत सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगामार्फत सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून महापालिकेच्या ५० कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, त्यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. (Nashik Lok Sabha election marathi news)

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सभा, मेळावे या माध्यमातून राजकीय वातावरण तापले असताना आचारसंहिता पूर्वी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून सर्वप्रथम कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव केली जात आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून महापालिकेसह विविध शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.

महापालिकेला ५० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हा निवडणूक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे, मुख्य लेखा व वित्त विभाग, लेखापरीक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरसचिव व विविध कर विभागातील कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी सेवा वर्ग करण्यात आली आहे.

या संदर्भात प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी खाते प्रमुखांना सूचना दिल्या. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे नियुक्ती रद्द करता येणार नाही. निवडणुकांसाठी हजर होणे बंधनकारक आहे जे कर्मचारी हजर होणार नाही. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

कामकाजावर परिणाम

महापालिकेकडे आदेश कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त आणखी कर्मचाऱ्यांची मागणी होणार आहे. त्याशिवाय महापालिकेला आचारसंहिता काळात नवीन कामे हाती घेता येणार नाही. ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करण्यात आल्याने परिणामी नागरी सेवादेखील ठप्प होणारा आहे.

यातून पालिकेच्या सेवेवर परिणाम होईल. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला. त्यानंतर महापालिकेकडून डीप क्लीन मोहीम राबविण्यात आली. मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा संकलित करण्यासाठीदेखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होणार आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT