Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेचा तिढा कायम; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चर्चा लांबणीवर

Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल होणार असताना महायुतीमध्ये लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल होणार असताना महायुतीमध्ये लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (ता. २७) महाराष्ट्र दौरा असल्याने महायुतीचे वरिष्ठ नेते दौऱ्यात गुंतल्याने कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे इच्छुक पुन्हा नाशिकमध्ये परतले. ४३ दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा महायुतीमध्ये अद्यापही सुटलेला नाही. ( rift of candidacy for Lok Sabha constituency has not been resolved in Grand Alliance)

त्या तुलनेत महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीकडून भाजपतर्फे पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून सूचना आल्यास उमेदवारीसंदर्भात भाजपकडून तातडीने हालचाली गतिमान होतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनाही (शिंदे गट) नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहे.

ठाण्याच्या बदल्यात नाशिक किंवा नाशिकच्या बदल्यात ठाणे, असा अदलाबदलीचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो. मात्र नाशिकसाठी शिंदे गटाने आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र भुजबळांनी उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात होत असलेला विलंब लक्षात घेऊन स्वतः माघार घेत असल्याची घोषणा केली.

मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेचा आग्रह सोडलेला नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन ४३ दिवस झाले. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.(Nashik Political News)

भुजबळ नाशिकमध्ये, तर करंजकर मुंबईत

उमेदवार निश्चितीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २६) तातडीने मुंबईला रवाना झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये परतले आहेत. मात्र नाशिकच्या जागेसंदर्भात ठोस असा निर्णय अद्याप झालेला नाही. दुसरीकडे शिवसेनेचे लोकसभा संघटक विजय करंजकर शिर्डीहून मुंबईला रवाना झाल्याचे समजते. विद्यमान खासदार हेमंत गोडसेही अद्याप तुळजापूरलाच असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी रविवारी (ता. २८) ते मुंबईला जाणार असल्याचे सांगितले जाते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी

शनिवारी दिवसभरात प्रमुख नेत्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटी झाल्या. नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांची शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी भेट घेतली. महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद मिळावा, यासाठी आपण भेट घेतल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दुसरीकडे नाशिक रोड येथील महंत अनिकेतशास्त्री यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. येत्या दोन-तीन दिवसांत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT