Girish Mahajan Nashik Riots Esakal
नाशिक

Nashik Riots: नाशिकमध्ये खासगी बंदुकीचा वापर, भाजप मंत्र्याचा खळबळजनक आरोप; दंगलीत 10 पोलिसही जखमी

Girish Mahajan Nashik Riots: जुन्या नाशिकमध्ये दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंनी जोरात दगडफेक झाली. यात पोलिस जखमी झाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

हिंदू धर्मियांकडून नाशिकमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, दुपारनंतर शांततेत सुरू असलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ नाशिकमध्ये येत आढावा घेतला.

जुन्या नाशिकमध्ये दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंनी जोरात दगडफेक (Nashik Riots) झाली. यात पोलिस जखमी झाले आहेत. यात, खासगी बंदुकांचा वापर झाला आहे, असे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री महाजन यांनी या वेळी दिली. शहरात दाखल झाल्यानंतर महाजन यांनी आढावा घेत, प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

महाजन म्हणाले, की यात जुन्या नाशिकला दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक करू नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

या दगडफेकीत तीन जण गंभीर जखमी झाले असून आठ ते दहा पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले त्या निषेधार्थ आपण सर्वांनी त्याचा निषेध केला पाहिजे होता. देशात आपण सर्व एक आहोत. मात्र, शहरातील काही भागात दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. दोन्ही बाजूंनी जोरात दगडफेक झाली. यावेळी खासगी बंदुकांचा वापर झाला असल्याचे समोर येत आहे. घडलेल्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

मला 'तेथे' गेल्यावर कळाले

पंचाळे येथे सुरू असलेल्या सप्ताहात रामगिरी महाराजांनी जे विधान केले त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. त्याबाबत महाजन यांना विचारले असता याबाबत रामगिरी महाराज नोटीस आल्यावर ते उत्तर देतील. मी सराला बेट आणि रामगिरी महाराज यांच्या दर वर्षी होणाऱ्या कार्यक्रमांना जात असतो. मी सिन्नर येथे गेल्यावर कळले, की असा काही प्रकार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

SCROLL FOR NEXT